Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरच्या घरी चित्रपटगृहासारखा मनोरंजनाचा अनुभव देण्यासाठी ‘सोनी इंडिया’तर्फे ‘ब्राव्हिया थिएटर’ श्रेणीत नव्या...

घरच्या घरी चित्रपटगृहासारखा मनोरंजनाचा अनुभव देण्यासाठी ‘सोनी इंडिया’तर्फे ‘ब्राव्हिया थिएटर’ श्रेणीत नव्या ऑडिओ उत्पादनांची भर

नवी दिल्ली, २४ जून २०२६ : ‘सोनी इंडिया’ने आज आपल्या ब्राव्हिया या थिएटर उत्पादन श्रेणीचा विस्तार केला आहे. फ्लॅगशिप मॉडेल ‘ब्राव्हिया थिएटर ट्रिओ’सह ‘ब्राव्हिया थिएटर बार ७’, ‘ब्राव्हिया थिएटर बार ५’, ‘ब्राव्हिया थिएटर सब ९’, ‘ब्राव्हिया थिएटर सब ८’, ‘ब्राव्हिया थिएटर रिअर ९’ आणि ‘रिअर ८’ ही नवीन उत्पादने ‘सोनी इंडिया’ने आज सादर केली.

 

 

 

घरच्या घरी चित्रपटगृहासारखा अनुभव ग्राहकांना मिळावा यासाठी ही नवीन उत्पादने विकसित करण्यात आली आहेत. या नव्या श्रेणीत ‘सोनी’च्या प्रगत ऑडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ध्वनीचा अधिक व्यापक अनुभव मिळतो आणि निर्मात्याने अपेक्षिलेला ध्वनीचा अनुभव अधिक वास्तववादी पद्धतीने घेता येतो. या उत्पादन श्रेणीतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ब्राव्हिया थिएटर ट्रिओ’. अतिशय मोठ्या स्क्रीनसाठी तयार करण्यात आलेली ही प्रीमियम वायरलेस होम थिएटर प्रणाली घरातच खऱ्या चित्रपटगृहाचा अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.

 

 

 

‘सोनी इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील नय्यर म्हणाले, “भारतात प्रीमियम होम एंटरटेनमेंट विभागात सातत्याने वाढ होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. घरच्या घरी चित्रपटगृहासारखा अनुभव घेण्यास ग्राहकांची अधिक पसंती असते, असे दिसून आले आहे. त्या दृष्टीने ही उत्पादने आम्ही सादर केली आहेत. यातून ब्राव्हिया परिसंस्थेचा विस्तार करण्याची आणि ध्वनी व दृश्य यांचे अनुभव एकत्रितपणे देणारे उपाय उपलब्ध करून देण्याची आमची कटिबद्धता दिसून येते. ध्वनीचा उत्कृष्ट अनुभव, अधिक प्रभावी बास, अधिक समृद्ध सराउंड साउंड, सुलभ कनेक्टिव्हिटी आणि उत्तम मूल्य या गोष्टी शोधणाऱ्या विविध ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ती विकसित करण्यात आली आहे.”

 

 

 

‘सोनी कॉर्पोरेशन’च्या होम एंटरटेनमेंट बिझनेस युनिटमधील होम प्रॉडक्ट बिझनेस विभागाचे ग्लोबल प्रमुख नेझू डायसुके म्हणाले, “प्रीमियम होम एंटरटेनमेंट क्षेत्रात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आमच्या कटिबद्धतेलाही यामुळे बळ मिळाले आहे. भारत ही ‘सोनी’साठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन होम एंटरटेनमेंट क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणारी अद्ययावत तंत्रज्ञाने आणि अनुभव सादर करण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील.”

 

 

 

ब्राव्हिया थिएटर ट्रिओ

ब्राव्हिया थिएटर ट्रिओ ही ‘सोनी’ची फ्लॅगशिप वायरलेस होम थिएटर प्रणाली आहे. आजच्या अतिशय मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीसाठी ती विशेषकरून विकसित करण्यात आली आहे. सामान्य साउंडबारच्या तुलनेत ‘ब्राव्हिया थिएटर ट्रिओ’मध्ये स्वतंत्र असे डावे, मध्यवर्ती आणि उजवे स्पीकर देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिक ध्वनीचा व्यापक अनुभव मिळतो आणि संवाद अधिक स्पष्टपणे ऐकू येतात.

 

२. ब्राव्हिया थिएटर बार ७

 

‘ब्राव्हिया थिएटर बार ७’मुळे ‘सोनी’च्या प्रगत ३६० स्पेशियल साउंड मॅपिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने घरच्या घरी प्रीमियम चित्रपटगृहाचा अनुभव घेता येतो. ‘व्हर्च्युअल फँटम स्पीकर्स’च्या सहाय्याने अधिक व्यापक आणि प्रभावी ध्वनी अनुभव निर्माण होतो. ‘सोनी’च्या विशेष ‘साउंड फील्ड ऑप्टिमायझेशन’ तंत्रज्ञानासह ‘डॉल्बी अॅटमॉस’ आणि ‘आयमॅक्स एन्हान्स्ड सपोर्ट’मुळे हा साउंडबार सखोल आणि वास्तववादी आवाजाचा अनुभव देतो.

 

३. ब्राव्हिया थिएटर बार ५

 

‘ब्राव्हिया थिएटर बार ५’ हा अनेक प्रगत वैशिष्ट्यांनी सज्ज असलेला साउंडबार आहे. अधिक प्रभावी असा ध्वनीचा अनुभव आणि स्पष्ट संवाद ऐकू यावेत यासाठी तो विकसित करण्यात आला आहे. या साउंडबारसोबत वायरलेस सबवूफर (पॅकेजमध्ये समाविष्ट) दिला जातो.

 

४. ब्राव्हिया थिएटर सब ९

 

‘ब्राव्हिया थिएटर सब ९’ हा प्रीमियम वायरलेस सबवूफर आहे. घरच्या मनोरंजनासाठी अधिक खोल आणि चित्रपटगृहासारखा प्रभावी बास असा अनुभव देण्यासाठी तो विकसित करण्यात आला आहे. अत्यंत कमी फ्रिक्वेन्सीच्या ध्वनीलहरी निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे हा सबवूफर चित्रपट, संगीत आणि गेमिंगचा अनुभव अधिक प्रभावी बनवतो. त्याचा दमदार बास संपूर्ण खोलीत ध्वनीचा प्रभाव निर्माण करतो.

 

५. ब्राव्हिया थिएटर सब ८

 

‘ब्राव्हिया थिएटर सब ८’ हा ‘सोनी’चा प्रीमियम सुपर डीप बास सबवूफर आहे. अधिक प्रभावी आणि चित्रपटगृहासारखा श्रवणानुभव देण्यासाठी तो विकसित करण्यात आला आहे. अधिक खोल, समृद्ध आणि स्पष्ट बास देण्यासाठी या सबवूफरमध्ये ३०० वॅट क्षमतेचा अॅम्प्लिफायर, ड्युअल सबवूफर रचनेला सपोर्ट आणि टिकाऊ अॅल्युमिनियम स्पीकर युनिट देण्यात आले आहे. त्यामुळे ध्वनी अधिक स्वच्छपणे व स्पष्ट ऐकू येतो.

 

६. ब्राव्हिया थिएटर रिअर ९

 

‘ब्राव्हिया थिएटर रिअर ९’ ही ‘सोनी’ची प्रीमियम रिअर स्पीकर प्रणाली आहे. ‘ब्राव्हिया थिएटर ट्रिओ’प्रमाणेच आकर्षक डिझाइन संकल्पनेवर आधारित ही प्रणाली अधिक प्रभावी सराउंड साउंडचा अनुभव देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. यामध्ये मोठे अप-फायरिंग स्पीकर्स आणि उच्च दर्जाचे अॅल्युमिनियम स्पीकर युनिट्स देण्यात आले आहेत. त्यातून त्रिमितीय आवाज येतो आणि त्यामुळे घरच्या घरी चित्रपटगृहासारखा श्रवणाचा अनुभव मिळतो.

 

७. ब्राव्हिया थिएटर रिअर ८

 

घरातील होम थिएटर अधिक प्रभावी बनवण्यासाठी ‘ब्राव्हिया थिएटर रिअर ८’ वायरलेस रिअर स्पीकर्स विकसित करण्यात आले आहेत. अधिक समृद्ध सराउंड साउंडचा अनुभव आणि वापरातील लवचिकता ही या स्पीकरची वैशिष्ट्ये आहेत. सुसंगत अशा ब्राव्हिया थिएटर प्रणालींसोबत हे स्पीकर्स सहजपणे जोडता येतात. त्यामुळे ध्वनीला अधिक खोली आणि दिशात्मक अचूकता मिळते.

 

८. ब्राव्हिया डायरेक्ट कनेक्ट

 

‘सोनी’ने ‘ब्राव्हिया डायरेक्ट कनेक्ट’ हे विशेष वैशिष्ट्यही सादर केले आहे. याच्या मदतीने ब्राव्हिया टीव्ही कोणत्याही साउंडबारशिवाय थेट ब्राव्हिया थिएटर सबवूफर्स आणि रिअर स्पीकर्सशी जोडता येतात आणि ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार ध्वनीचा अनुभव अधिक प्रभावी बनवण्याची मुभा मिळते. अधिक दमदार बास मिळवणे, सराउंड साउंडचा विस्तार करणे किंवा टप्प्याटप्प्याने होम थिएटर प्रणाली उभारणे या वैशिष्ट्यामुळे शक्य होते.

 

 

किंमत आणि उपलब्धता :

 

‘ब्राव्हिया थिएटर ट्रिओ’ १ जुलै २०२६ पासून सोनी सेंटर, सोनी एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स अशा ‘सोनी’च्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये, तसेच अॅमेझॉनवर उपलब्ध होईल. तसेच ‘ब्राव्हिया थिएटर बार ७’ आणि ‘ब्राव्हिया थिएटर बार ५’ हे १ जुलै २०२६ पासून सोनी सेंटर, सोनी एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स या ‘सोनी’च्या रिटेल स्टोअर्समध्ये आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील.

 

 

 

मॉडेल

 

एमआरपी (₹)

 

खरेदीची विशेष किंमत (₹)

 

उपलब्धता

 

ब्राव्हिया थिएटर ट्रिओ

 

२,३९,९९०

 

१,६९,९९०

 

१ जुलै २०२६ पासून

 

ब्राव्हिया थिएटर बार ७

 

९९,९९०

 

८२,९९०

 

१ जुलै २०२६ पासून

 

ब्राव्हिया थिएटर बार ५

 

३७,९९०

 

२९,९९०

 

१८ ऑगस्ट २०२६ पासून

 

ब्राव्हिया थिएटर सब ९

 

९४,९९०

 

७९,९९०

 

३ ऑगस्ट २०२६ पासून

 

ब्राव्हिया थिएटर सब ८

 

४२,९९०

 

३४,९९०

 

३ ऑगस्ट २०२६ पासून

 

ब्राव्हिया थिएटर रिअर ८

 

४४,९९०

 

३९,९९०

 

१ जुलै २०२६ पासून

 

ब्राव्हिया थिएटर रिअर ९

 

७४,९९०

 

५८,९९०

 

१ जुलै २०२६ पासून

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments