Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेट*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेट*

 

 

पुणे, दि.२६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए., विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आदी उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. श्री. महेश पाटील यांनी सारथीच्या विविध उपक्रमांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments