पुणे, दि. २९ जून २०२६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांना भारतीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोलर डेकेथॉन इंडिया या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय व्यासपीठातर्फे मिळाला असून हे व्यासपीठ शाश्वत हवामानपूरक बांधकाम पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे.
डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांना या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांची शाश्वत शैक्षणिक कारकीर्द तसेच विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करण्याचे आणि प्रगत डिझाईनचा वापर करण्याच्या कार्याचा गौरव केला आहे. हा पुरस्कार आणखी दोघांना मिळाला आहे.
या पुरस्काराचाच एक भाग म्हणून बीएनसीएला ‘५० परवान्यांची (लायसन्सेस) सुविधा असणारे आयईएस सॉफ्टवेअर’ प्रदान करण्यात आले आहे. त्यायोगे जागतिक पातळीवरील बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ऊर्जेचे समन्वय साधणारे सॉफ्टवेअर याद्वारे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील परिपूर्ण प्रशिक्षण आणि संशोधन करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या सॉफ्टवेअरचे नेमके महत्व व त्याचा शिक्षणामध्ये होणारा वापर सांगताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, पर्यावरणपूरक बांधकामात हे सॉफ्टवेअर उपयुक्त असून ‘नेट झीरो’ ऊर्जेसाठी ते उपयोगी आहे. जगभरात हरित इमारतींसाठीही ते वापरले जा
ते.


