पुणे, जून ३०, २०२६: सॅमसंगने आज गॅलेक्सी ए २७ ५जी च्या लाँचची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन तरुण वापरकर्त्यांचा विचार करून डिझाइन करण्यात आला आहे. यात नाविन्यता आणि तंत्रज्ञानाचा उत्तम मिलाफ साधण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्टाइल, कार्यक्षमता आणि किफायतशीरपणाचे उत्तम संयोजन आहे.
सर्वोत्तम व्युईंगसाठी दर्जेदार डिस्प्ले
गॅलेक्सी ए २७ ५जी ची १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेली ६.७ इंच सुपर एएमओएलईडी स्क्रीन, हे या स्मार्टफोनचे सर्वाधिक चांगले वैशिष्ट्य आहे. आकर्षक रंगसंगती, स्पष्ट तपशील आणि स्मूथ व्हिज्युअल्ससह उत्कृष्ट टच रिस्पॉन्स देते. या स्मार्टफोनचा अपग्रेडेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले कॅमेऱ्याची जागा कमी करण्यासाठी खास पंच-होल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे स्क्रीन पाहण्याचा सलग अनुभव मिळतो. तसेच स्क्रीनच्या अधिक मजबूतीसाठी यात कॉर्निंग® गोरिला® ग्लास व्हिक्टस®+ चे संरक्षण देण्यात आले आहे.
गेमिंग आणि उत्पादकतेसाठी प्रबळ कार्यक्षमता
हूड अंतर्गत गॅलेक्सी ए २७ ५जी मध्ये उर्जा-कार्यक्षम ४ एनएम स्नॅपड्रॅगन ६ जेन ३ मोबाइल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे, ज्याला यूएफएस ३.१ स्टोरेज आणि एलपीडीडीआरएक्स५ रॅमची जोड देण्यात आली आहे. यामुळे स्मार्टफोनला वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह कार्यक्षमता मिळते. यातील सुधारित जीपीयू स्पीडमुळे ग्राफिक्स अधिक स्मूथ दिसतात, तर नवीन हाय-स्पीड मेमरीमुळे मल्टिटास्किंग करताना, इंटरनेट ब्राउझिंग करताना, व्हिडिओ स्ट्रीमिंग, अॅप्स बदलताना, एआय अॅप्लिकेशन्सवर काम करताना आणि गेम्स खेळताना जलद डेटा ट्रान्सफर आणि उत्तम बॅटरी कार्यक्षमता मिळते.
नो-शेक ट्रिपल कॅमेरा
गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ओआयएस आणि ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, ११५ अंश फील्ड ऑफ व्ह्यू असलेला ५ मेगापिक्सल अल्ट्रावाईड कॅमेरा आणि ६x४ इंच आकाराचे प्रिंट-योग्य ३०० डीपीआय फोटो काढू शकणारा २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमधील १२ मेगापिक्सल एचडीआर फ्रंट कॅमेरा अचूक एक्सपोज्ड पोर्ट्रेट आणि उच्च दर्जाचे व्हिडिओ कॉल्स सुनिश्चित करतो. हे कॅमेरा फीचर्स एआय-सक्षम फोटो-एडिटिंग टूल्सद्वारे अधिक प्रगत होतात, जसे फोटोमधील नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी ऑब्जेक्ट इरेझर, सर्वोत्तम एडिट्स सुचवणारे एडिट सजेशन्स आणि निवडलेल्या फोटोची स्टाइल व रंग तुमच्या फोटोंवर लागू करणारे माय फिल्टर.
सुलभ कामासाठी ऑसम इंटेलिजन्स
गॅलेक्सी ए२७ ५जी मधील सर्कल टू सर्च विथ गुगल वैशिष्ट्य एकाच वेळी अनेक गोष्टी ओळखण्यास सपोर्ट करते, तर व्हॉईस रेकॉर्डर अॅपमधील व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन २२ भाषांमध्ये रिअल-टाइम भाषांतर करते, ज्यामुळे मिटिंगच्या नोट्स घेणे सोपे होते. सुलभ संवादासाठी गॅलेक्सी ए २७ ५जी मध्ये गुगल जेमिनी आणि परप्लेक्सिटी सारखे एआय असिस्टंट गॅलरीसह मूळ गॅलेक्सी अॅप्समध्ये खोलवर समाविष्ट करण्यात आले आहेत. साध्या आणि नैसर्गिक भाषेतील कमांड्सद्वारे फोनच्या सेटिंग्स व फीचर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिक्स्बी डिवाईस एजंट म्हणून काम करतो. एआय-सक्षम संवादासाठी गॅलेक्सी ए २७ मध्ये लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन दिले आहे, जे व्हॉईसमेल आणि कॉल्स एकाच वेळी इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेत लिखित स्वरूपात (ट्रान्सक्राइब) सादर करते.
दिवसभर कार्यरत राहणारी बॅटरी, दीर्घकालीन सपोर्ट आणि प्रबळ सुरक्षा
गॅलेक्सी ए २७ ५जी मध्ये दिवसभर वापरण्यासाठी फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करणारी ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सहा वेळा अँड्रॉइड ओएस/वन यूआय अपग्रेड्स आणि सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देतो. सॅमसंग नॉक्स आणि नॉक्स व्हॉल्ट हार्डवेअर-आधारित संरक्षणासह गॅलेक्सी ए २७ ५जी वैयक्तिक फोटो आणि डॉक्यूमेंट्ससह वापरकर्त्यांच्या संवेदनशील माहितीची सुरक्षा सुनिश्चित करतो. तसेच, सॅमसंग वॉलेट वापरकर्त्यांना टॅप अँड पे ची सुविधा देतो, यूपीआय पेमेंटला सपोर्ट करतो आणि डिजिटल आयडी व प्रवासाची कागदपत्रे सुरक्षितपणे स्टोअर करून ठेवतो.
उपलब्धता आणि ऑफर्स
गॅलेक्सी ए २७ ५जी स्मार्टफोन ३ जुलैपासून लाइट ग्रीन, लाइट पिंक आणि ब्लॅक या रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज अशा तीन पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. ग्राहक गॅलेक्सी ए२७ ५जी सॅमसंग एक्सक्लुझिव्ह आउटलेट्स, पार्टनर स्टोअर्स, Samsung.com आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनच्या सर्व मॉडेल्सवर ३,००० रुपयांचा बँक/यूपीआय कॅशबॅक मिळू शकतो किंवा निवडक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांकडून १५ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी झिरो डाउन पेमेंट योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. याव्यतिरिक्त, गॅलेक्सी ए २७ ५जी स्मार्टफोन निवडक नॉन- बँकिंग फायनान्शियल कंपन्यांकडून ८ महिन्यांच्या डाउन पेमेंटसह २४ महिन्यांच्या ईएमआय पर्यायावर देखील उपलब्ध आहे.
मॉडेल
व्हेरिएंट
मल्टी-बँक व यूपीआय कॅशबॅक
एनईपी (रूपये)
गॅलेक्सी A27 ५जी
६ + १२८ जीबी
३०००
२८९९९
८ + १२८ जीबी
३१९९९
८ +२५६ जीबी
३७४९९


