चिंचवडमध्ये नवीन अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटर. येथे ग्राहकांना संपूर्ण EV मालकीचा अनुभव मिळणार असून, अँपिअरच्या पुरस्कारप्राप्त इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओसह टेस्ट राइड, वित्तपुरवठा सहाय्य आणि विक्रीनंतरची सेवा उपलब्ध असेल.
बंगळुरू/पुणे, 3 जुलै 2026: ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचा इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड अँपिअरने जय माता दी ऑटो यांच्या भागीदारीत चिंचवड येथे नवीन अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन करून पुण्यातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक मोबिलिटी बाजारपेठांपैकी एक असलेल्या पुण्यात अँपिअरच्या पुरस्कारप्राप्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या वाढत्या पोर्टफोलिओपर्यंत अधिक सुलभ प्रवेश मिळवून देत ग्राहकांना EV खरेदी आणि मालकीचा अखंड व सुलभ अनुभव देण्यासाठी हे अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटर तयार करण्यात आले आहे.
चिंचवड येथील नवीन अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास सिंह, ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. मनोज एमपी आणि जय माता दी ऑटोचे श्री. मनीष मोहिते यांच्या हस्ते ग्राहक, डीलर भागीदार आणि EV प्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने रिबन कापून या नवीन अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटरचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
हे उद्घाटन ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या मजबूत व्यावसायिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये कंपनीने 786 कोटी रु. महसूल नोंदवला. मागील वर्षाच्या तुलनेत तो 19 टक्क्यांनी अधिक आहे. अँपिअरच्या इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीत 49 टक्क्यांची वाढ झाली, तर कंपनीचा बाजारातील हिस्सा 3.5 टक्क्यांवरून 4.3 टक्क्यांपर्यंत वाढला. याशिवाय, आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीने आपली मजबूत वाढ कायम राखत VAHAN नोंदणी जवळपास दुप्पट करून 25,641 युनिट्सपर्यंत नेली. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 101 टक्के अधिक आहे (आर्थिक वर्ष 26 ची पहिली तिमाही: 12,770 युनिट्स). ही वाढ याच कालावधीत उद्योगाने नोंदवलेल्या 67 टक्के वाढीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचा बाजारातील हिस्सा 4.9 टक्क्यांपर्यंत वाढला असून त्यातून ग्राहकांकडून सातत्यपूर्ण मागणी आणि कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी पोर्टफोलिओमधील वाढता वेग अधोरेखित होतो. या प्रगतीच्या बळावर ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी सुधारित रिटेल पायाभूत सुविधा आणि विविध प्रदेशांमध्ये अधिक सखोल विस्ताराद्वारे प्रमुख EV बाजारपेठांमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करत आहे.
यावेळी बोलताना ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास सिंह म्हणाले, “पुणे ही भारतातील सर्वात महत्त्वाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी बाजारपेठांपैकी एक असून, ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीला विकास करण्यासाठीचा एक महत्त्वाचा प्रदेश आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तरुण शहरी प्रवाशांच्या गतिमान परिसंस्थेमुळे पुणे भावी काळात भारतातील EV ग्राहकांचे माहेरघर बनेल. जय माता दी ऑटो यांच्यासोबतची आमची भागीदारी आणि या नवीन अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन यातून ग्राहकांना उत्कृष्ट मालकीचा अनुभव देत विश्वासार्ह, स्मार्ट आणि सहज उपलब्ध इलेक्ट्रिक वाहनांचे दळणवळण त्यांच्यापर्यंत अधिकाधिक पोहोचवण्याची आमची बांधिलकी आणखी मजबूत होत आहे.”
अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली सर्वसमावेशक सेवा अनुभव मिळणार असून त्यामध्ये उत्पादनाविषयी मार्गदर्शन, सल्ला सेवा, वाहनांचे प्रदर्शन, टेस्ट राइड, वित्तपुरवठा सहाय्य आणि समर्पित विक्रीनंतरची सेवा यांचा समावेश आहे. येथे ग्राहकांना अँपिअरचे महत्वपूर्ण फ्लॅगशिप नेक्सस अनुभवता येईल. या मॉडेलने कोल्ली हिल्समधील 70 हेअरपिन वळणे यशस्वीरित्या पार करत तसेच भारतातील सर्वाधिक उंचीवरील वाहनयोग्य पर्वतीय खिंडींपैकी एक असलेल्या शिपकी ला पासपर्यंत पोहोचून आपल्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे सादरीकरण केले आहे. या सेंटरमध्ये मॅग्नस पोर्टफोलिओ तसेच नुकतीच सादर करण्यात आलेली अँपिअर रिओ व्हाइब देखील प्रदर्शित करण्यात आली आहे. विविध ग्राहकवर्गांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही तयार करण्यात आली आहे.
आधुनिक रिटेल केंद्र म्हणून विकसित करण्यात आलेले अँपिअर एक्स्पिरियन्स सेंटर संभाव्य ग्राहकांना प्रशिक्षित उत्पादन तज्ज्ञांशी संवाद साधण्याची, इलेक्ट्रिक मोबिलिटीचे फायदे समजून घेण्याची आणि आरामदायी तसेच संवादात्मक वातावरणात सुजाण खरेदी निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करून देते. आपल्या वाढत्या रिटेल नेटवर्कद्वारे ग्राहकांशी अधिक प्रभावी संवाद साधणे आणि त्यांच्या मालकीच्या अनुभवात सातत्याने सुधारणा करणे ही अँपिअरची बांधिलकी या केंद्रातून
प्रतीत होते.


