पुणे, ६ जुलै २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) चा सीएसआर विभाग असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन (एचएमआयएफ) ने आज पॅरा-ॲथलीट आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर चंदीप सिंग यांच्या जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला पाठिंबा जाहीर केला. ‘समर्थ बाय ह्युंदाई’ या सामाजिक उपक्रमाअंतर्गत एचएमआयएफ चंदीप सिंग यांच्या जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी आणि पुन्हा परतीच्या ७,००० हून अधिक किलोमीटरच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला सहकार्य करत आहे. या मोहिमेचा उद्देश ‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये एक नवा विक्रम नोंदवणे हा आहे. जिद्द आणि दृढनिश्चयाच्या बळावर चंदीप सिंग मॉडिफाईड ह्युंदाई क्रेटा चालवत देशव्यापी ही मोहीम पूर्ण करणार आहेत.या मोहिमेची अधिकृत नोंद ठेवली जाणार असून, विक्रमाची पडताळणी करण्यासाठी तिचे औपचारिक मूल्यमापनही करण्यात येणार आहे.


