Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वर्गीय बाबा शिंगोटे यांचे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य ...

स्वर्गीय बाबा शिंगोटे यांचे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लालबाग येथील चौक नामफलकाचे अनावरण

मुंबई, दि. 6 : स्वर्गीय मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे सामान्य कुटुंबातून मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभारला. वृत्तपत्र विक्रीपासून ते अग्रणी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक हा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे बाबा शिंगोटे यांनी नेहमी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवत समाजसेवेचे कार्य केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

 

 

 

लालबाग येथील नारायण उद्योग भवन जवळील चौकाचे ‘मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे’ असे नामकरण करण्यात आले. या नवीन चौक नामफलकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

 

 

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, पुण्यनगरी समूहाचे संचालक अरविंद शिंगोटे, प्रवीण शिंगोटे, भावेश शिंगोटे, प्रतीक शिंगोटे, राजकीय संपादक उदय तानपाठक, संपादक शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बाबा शिंगोटे यांनी वृत्तपत्र सृष्टीत मोठे विश्व निर्माण केले आहे. त्यांची दुसरी व तिसरी पिढी आपल्याला काम करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्यवसाय कितीही मोठा झाला असला, तरी बाबा शिंगोटे नेहमी आपले साधेपणाला धरून राहिले. कधीही मोठेपणा दाखवला नाही. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या चौकाच्या नामकरणातून अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची नेहमी आठवण आपल्या मनात कायम राहील.

 

 

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments