Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*मुसळधार पावसामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात तात्पुरते बदल*

*मुसळधार पावसामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात तात्पुरते बदल*

 

 

पुणे दि. ६ (जिमाका, वृत्तसेवा): मुसळधार पावसामुळे नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे येण्यास अडचणी निर्माण झाल्याने दैनंदिन कार्यालयीन कामकाजात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

 

यानुसार, आज IDTR येथे वाहनचालक चाचणीसाठी उपस्थित राहू न शकलेल्या अर्जदारांनी अपॉइंटमेंट पुन्हा निश्चित (Reschedule) करून स्वतःच्या सोयीनुसार किंवा पुढील १० दिवसांत चाचणीसाठी उपस्थित राहावे. शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीसाठी येऊ न शकलेल्या अर्जदारांनीही अपॉइंटमेंट रिशेड्यूल करून घ्यावी.

 

तसेच, ६ जुलै रोजी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आलेल्या वाहनांची प्रकरणे संबंधित अधिकाऱ्यांच्या दैनंदिन क्षमतेनुसार पुढील १० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत.

 

मुसळधार पावसाची परिस्थिती कायम राहिल्यास कार्यालयीन कामकाजाबाबत स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना पुढील सूचना देण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments