Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअल्कोहॉलिक्स अनॉनिमस पुणेचा सुवर्णमहोत्सव संपन्न; मद्यमुक्तीसाठी व्यावसायिकांच्या सहकार्यावर भर*

अल्कोहॉलिक्स अनॉनिमस पुणेचा सुवर्णमहोत्सव संपन्न; मद्यमुक्तीसाठी व्यावसायिकांच्या सहकार्यावर भर*

 

 

पुणे, दि. ५ : अल्कोहॉलिक्स अनॉनिमस (ए.ए.) पुणे यांच्या मद्यमुक्ती कार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गणेश कला क्रीडा भवन येथे सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात पार पडला. मद्यपानाच्या व्यसनाशी संबंधित व्यक्तींना प्रभावी मदत मिळावी या उद्देशाने डॉक्टर, पोलीस अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, वकील, समाजसेवक, व्यसनमुक्ती केंद्रांचे प्रतिनिधी आदी विविध क्षेत्रांतील व्यावसायिक सहभागी झाले.

 

कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शहरांमधून ६०० हून अधिक ए.ए. सदस्य तसेच अल-अनॉन फेलोशिपचे सदस्य उपस्थित होते. ए.ए. सदस्यांनी व्यसनमुक्तीचे अनुभव कथन केले, तर डॉ. आशिष देशपांडे यांनी व्यसनमुक्तीसाठी ‘बारा पायऱ्यांच्या कार्यक्रमाचे’ महत्त्व अधोरेखित करत व्यावसायिकांनी ए.ए.सोबत समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थितांनी उपक्रमाचे स्वागत करत आयोजन समितीचे कौतुक केले.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments