Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedसर भांडारकर यांची १८९वी जयंती साजरी*

सर भांडारकर यांची १८९वी जयंती साजरी*

 

पुणे, दि. ६ जुलै – थोर संशोधक आणि समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची १८९ वी जयंती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये आज साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, उपाध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, कोशाध्यक्ष संजय पवार, नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन तसेच संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, भरत फाटक, अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या दोन महिन्यांत घेण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सर भांडारकर यांचा ६ जुलै १८३७ रोजी मालवण येथे जन्म झाला होता. प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील सर्व विषयांमध्ये त्यांनी मूलगामी स्वरूपाचे संशोधन आणि लेखन केले होते. एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई, डेक्कन कॉलेज, पुणे येथे त्यांनी अध्यापन केले तसेच हजारो हस्तलिखितांचे संकलन केले. १८९३-९४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद देखील भूषवले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भांडारकर संस्थेची स्थापना १९१७ साली करण्यात आली. २४ ऑगस्ट १९२५ (ऋषीपंचमी) रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. सर भांडारकरांच्या कार्याचे स्मरण आज त्यांच्या जयंतीदिनी भांडारकर संस्थेच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments