भारतातील 30 प्रमुख शहरांमधील 4,000 हून अधिक कार्यालयीन ठिकाणे आणि 30,000 पेक्षा अधिक रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असलेली ‘लेट नाईट ईट्स’ सेवा ग्राहकांना निवडक जेवण, आकर्षक सवलती, जलद डिलिव्हरी आणि ‘2 एएम क्लब’चा विशेष प्रवेश देणार आहे.
भुवनेश्वर, गोवा, कोची, लखनौ, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद यांसारखी टियर-2 शहरे रात्री उशिरा कार्यालयांमध्ये होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवत आहेत.
कार्यालयीन परिसरांना सेवा देणाऱ्या एकूण रेस्टॉरंट्सपैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक रेस्टॉरंट्स रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ऑर्डर्स स्वीकारत आहेत.
पुणे; 8 जुलै 2026 : भारतातील आघाडीचे ऑन-डिमांड सुविधा प्लॅटफॉर्म स्विगी लिमिटेड (एनएसई: SWIGGY / बीएसई: 544285) ने रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी खास ‘लेट नाईट ईट्स’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. परवडणाऱ्या किमती, जलद सेवा आणि ग्राहकांच्या गरजांवर आधारित हा उपक्रम भारतातील वाढत्या रात्रपाळीतील कर्मचारी, विस्तारित कामाचे तास किंवा जागतिक वेळेनुसार काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी रात्रीच्या वेळी अन्न मागविण्याचा अनुभव अधिक सोपा आणि विश्वासार्ह बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत भारतातील 30 प्रमुख शहरांतील 4,000 हून अधिक कार्यालयीन ठिकाणी आणि 30,000 पेक्षा अधिक रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध आहे. या सेवेत निवडक जेवणाचे पर्याय, आकर्षक सवलती आणि जलद डिलिव्हरीचा लाभ मिळतो. या सेवेद्वारे बर्गर किंग, डॉमिनोज पिझ्झा, मॅकडोनाल्ड्स, केएफसी आणि सबवे यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांना ‘2 एएम क्लब’चाही लाभ मिळणार असून, रात्री किमान 2 वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या निवडक रेस्टॉरंट्सची सुविधा यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यावसायिकांना विश्वासार्हपणे अन्न उपलब्ध होणार आहे.
‘लेट नाईट ईट्स’ अंतर्गत ‘डेस्कईट्स’ या संकल्पनेद्वारे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या गरजेनुसार खास खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.यामध्ये ‘वन-हँडेड ग्रॅबीज’ (रोल्स, रॅप्स आदी), ‘हेल्दी निबल्स’ (धान्ययुक्त बाउल्स, सॅलड्स – आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी), ‘सिप-टॅस्टिक फ्युएल’ (कॉफी, चहा, शेक्स आणि इतर पेये), ‘स्ट्रेस मंचीज’ (फ्रेंच फ्राईज, हलके स्नॅक्स आणि छोटे खाद्यपदार्थ) तसेच ‘टीमवर्क बाइट्स’ (पिझ्झा) अशा विविध श्रेणींचा समावेश आहे. प्रत्येक पर्याय रात्री उशिरा काम करणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. वर्कस्टेशनवर सहज खाता येतील असे पदार्थ, झटपट स्नॅक्स, कॉफी, डेझर्ट्स तसेच सहकाऱ्यांसोबत शेअर करता येणाऱ्या ग्रुप ऑर्डर्सचा समावेश करून ही सेवा तयार करण्यात आली आहे, जेणेकरून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार योग्य खाद्यपर्याय सहज उपलब्ध होतील.
स्विगीच्या आकडेवारीनुसार, या कार्यालयीन ठिकाणांतील 25 टक्के कॉर्पोरेट कर्मचारी रात्री 10 नंतर कार्यालयातूनच अन्नाची ऑर्डर देतात. भुवनेश्वर, गोवा, कोची, लखनौ, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये रात्री उशिरा कार्यालयातून अन्न मागविण्याच्या ऑर्डर्समध्ये दुहेरी अंकांची वाढ (डबल-डिजिट ग्रोथ) नोंदविण्यात आली आहे. यावरून भारतातील ‘नाईट इकॉनॉमी’ आता केवळ पारंपरिक महानगरांपुरती मर्यादित न राहता
टियर-2 शहरांमध्येही वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘लेट नाईट ईट्स’च्या शुभारंभप्रसंगी स्विगीचे फूड स्ट्रॅटेजी, कस्टमर एक्सपीरियन्स आणि न्यू इनिशिएटिव्ह्स विभागाचे उपाध्यक्ष दीपक मालू म्हणाले, “आजच्या काळात कार्यस्थळाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. अनेक व्यावसायिक जागतिक वेळापत्रकानुसार तसेच वाढीव कामकाजाच्या तासांमध्ये काम करत आहेत. आमच्या निरीक्षणानुसार, रात्री 10 नंतर कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या ऑर्डर्समध्ये वर्षागणिक वाढ झाली आहे. यावरून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात अन्नाचे महत्त्व वाढत असल्याचे दिसून येते.रात्री उशिरा अन्न मागविण्याची ही प्रवृत्ती केवळ महानगरांपुरती मर्यादित नसून, टियर-2 शहरांतील कॉर्पोरेट केंद्रांमध्येही ती वेगाने वाढत आहे. **’लेट नाईट ईट्स’**च्या माध्यमातून आम्ही निवडक खाद्यपर्याय, जलद डिलिव्हरी आणि ग्राहकांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळेल अशा सुविधांद्वारे रात्री काम करणाऱ्या ग्राहकांसाठी फूड डिलिव्हरीचा अनुभव नव्याने तयार केला आहे. कार्यस्थळावरील कामकाजाच्या पद्धती सातत्याने बदलत असताना, भारतातील व्यावसायिकांसाठी रात्रीचे भोजन अधिक सहज उपलब्ध, उपयुक्त आणि फायदेशीर बनविण्याची मोठी संधी आम्हाला दिसत आहे. अधिकाधिक रेस्टॉरंट्सचा सहभाग, कार्यालयीन केंद्रांमध्ये सेवेचा विस्तार आणि भारतातील कायम कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलत्या गरजांनुसार सातत्याने नवे उपक्रम राबवत **’लेट नाईट ईट्स’**चा विस्तार आम्ही पुढेही करत राहू.”
बंगळुरूमधील एका प्रोग्राम मॅनेजरने सांगितले, “मी अनेकदा जागतिक टीमसोबत काम करत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत कार्यालयात असतो. नियमित जेवणाच्या वेळेनंतर चांगले खाद्यपदार्थ मिळणे नेहमीच सोपे नसते. अशा परिस्थितीत ‘लेट नाईट ईट्स’मधील निवडक खाद्यपदार्थ, आकर्षक ऑफर्स आणि जलद डिलिव्हरीची सुविधा माझ्यासाठी खरोखरच उ
पयुक्त ठरते.”


