Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या...

मोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद*

 

*’प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे; प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत, धीर सोडू नका’ – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी*

पिंपरी, दि. ९ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून इमारतीत अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी यंत्रणांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत धीर धरा, यामध्ये निश्चितपणे अडकलेल्या व्यक्ती सुखरुपपणे बाहेर येतील असा दिलासा देखील नातेवाईकांना त्यांनी दिला.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणा पूर्ण क्षमतेने आणि अत्यंत समन्वयाने बचावकार्य करत आहेत. ही वेळ अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे.

ते पुढे म्हणाले, प्रशासन संपूर्ण ताकदीने युद्धपातळीवर काम करत आहे. उपलब्ध सर्व मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक साधनांचा वापर करून शोध व बचाव मोहीम अखंडपणे सुरू आहे. तसेच प्रशासन तुमच्यासोबत आहे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी दिली जाईलअसेही त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांचे नातेवाईक थांबलेले आहेत. त्यांच्या भोजन, निवास आणि इतर सर्व आवश्यक सुविधा त्यांना पुरवा असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अँटनी अँड लारा कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले.

दरम्यान, एनडीआरएफचे सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी बचावकार्याची तांत्रिक माहिती नातेवाईकांना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments