Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedगिरवी गोपाळ कृष्ण मंदिरात वैदिक आणि पर्जन्यसूक्त अनुष्ठान

गिरवी गोपाळ कृष्ण मंदिरात वैदिक आणि पर्जन्यसूक्त अनुष्ठान

निर्जला एकादशी निमित्ताने गिरवी गोपाळ कृष्ण मंदिरात दिनाक 25 जून 2026 रोजी वैदिक अनुष्ठान करण्यात आले आणि या वर्षी पर्जन्य आगमन लांबल्याने चिंतेचे वातावरण ग्रामीण तसेच शहरी भागात निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन पर्जन्य सूक्त पठण करण्यात आले त्याचा अनुकूल परिणाम तत्काळ दिसू लागला आणि जोरदार वृष्टी सुरू झाली तसा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसिद्ध होऊन सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले शेती तसेच पाण्याची नागरी व शहरी भागातील टंचाईचे संकट दूर झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे या प्राचीन आणि जागृत मंदिरात वैदिक अनुष्ठान सातत्याने होत असतात आणि संकल्पात राष्ट्र आणि समाज कल्याण याचा आवर्जून उल्लेख केला जातो उच्चार करणाऱ्या ज्येष्ठ वैदिक पंडिता ही या साठी मंदिर व्यवस्थापनाचे कौतुक करीत असतात. या पूर्वी सुद्धा अशा प्रसंगी पर्जन्य सूक्त पठण करताच अनुकूल परिणाम अनुभवास आला होता याची आठवण जाणकार काढतात

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments