Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे येथील खराडी परिसरात ‘एनआयओ आयज प्लस’ नव्या अत्याधुनिक सुपर स्पेशलिटी नेत्र...

पुणे येथील खराडी परिसरात ‘एनआयओ आयज प्लस’ नव्या अत्याधुनिक सुपर स्पेशलिटी नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन

डोळ्यांच्या सर्व आजारांवर जागतिक दर्ज्याचे सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खात्रीलायक यशस्वी उपचार दिले जाणार.

 

पुणे, १२.७.२०२६ – डोळ्यांच्या उपचारांसाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या ‘एनआयओ आयज प्लस’ या प्रसिद्ध सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नेटवर्कने पुणे येथे वेगाने विकसित होणा-या खराडी परिसरात नवे अद्यायावत रुग्णालय उभारले आहे. पुण्यातील सर्व नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्तम दर्ज्याची नेत्र सेवा आणि उपचार उपलब्ध करुन देणे हे ‘एनआयओ आयज प्लस’चे उद्दिष्ट आहे. या ध्येयपूर्तीसाठी नवीन रुग्णालयाची उभारणी करणे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

नव्या रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ‘एनआयओ आयज प्लस’चे संचालक डॉ. आदित्य केळकर म्हणाले, ‘‘रूग्णांना डोळ्यांच्या उपचारांसंदर्भात सर्वोत्तम सेवासुविधा मिळाव्यात, हेच आमचे ध्येय राहिले आहे. खराडीसारख्या वेगाने वाढणा-या उपनगरामध्ये स्थानिक नागरिकांमधून डोळ्यांच्या प्रगत उपचासांची मागणी सातत्याने वाढू लागली आहे. नव्या रुग्णालयात आधुनिक निदान पद्धती, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सुलभ उपचार प्रक्रिया यांचा समन्वय साधला जातो. डोळ्यांच्या गंभीर आजारांवरही खात्रीलायक उपचार दिले जातात. हे केंद्र केवळ सामान्य नेत्रतपासणीपुरते मर्यादित नसून येथे विविध शस्त्रक्रिया आणि खास नेत्रोपचारही उपलब्ध असतील. बहुतांश रुग्णांना एकाच दिवसात यशस्वी उपचार देत त्याच दिवशी घरी परतता येईल, अशी सुविधाही देण्यात आली आहे. गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ पुणेकरांचा ‘एनआयओ आयज प्लस’ वरील विश्वास आता नव्या रुग्णालयामुळे आणखी दृढ होईल, असा आम्हांला विश्वास आहे.”

रुग्णालयाच्या ‘एनआयओ आयज प्लस’च्या संचालिका डॉ. जाई केळकर म्हणाल्या, “डोळ्यांच्या आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होणे गरजेचे आहे. आजाराचे निदान तत्काळ झाल्यास यशस्वी उपचारांची खात्री मिळते. मधुमेह, वाढते वय, चष्म्याचा वाढता नंबर, डोळे कोरडे पडणे किंवा अंधुक दृष्टी असल्यास डोळ्यांची वेळेवर तपासणी करायला हवी.”

या नवीन रुग्णालयाचे उद्घाटन एनआयओ आयज प्लस संचालक डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील इतर डॉक्टरांची टीम आणि परिचारिकाही उपस्थित होत्या. उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांना कमी कालावधीतील मुक्कामात अत्याधुनिक यशस्वी उपचार दिले जावेत, याकडे नव्या रुग्णालयीन प्रशासन प्रयत्नशील असेल. सर्वसाधारण नेत्रउपचारांसह, मोतीबिंदू उपचार, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठीच्या शस्त्रक्रिया, रेटिना, काचबिंदू, कॉर्निया व डोळ्यांच्या बाह्य भागावरील आजारांवरील उपचार, बालरोग नेत्रचिकित्सा, न्यूरो-ऑप्थॅल्मोलॉजी, ऑक्युलोप्लास्टी, युव्हायटिस आणि डोळे दुखणे या सर्व आजारांवर अत्याधुनिक निदानपद्धती,ऑप्टिकल सेवा आणि प्रतिबंधात्मक उपचारपद्धतीही उपलब्ध असेल. रुग्णांवर सर्वसमावेशक उपचार करण्यासाठी या रुग्णालयात व्हेवलाइट प्लस लेसिक, सिल्क लेसिक आणि कॉन्टुरा लेसक यांसारख्या जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून ‘एनआयओ आयज प्लस’च्यावतीने महिनाभर मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जुलै ते ३१ जुलै दरम्यान या शिबीराला भेट देत नेत्रतपासणी करता येईल. ही नेत्रतपासणी निःशुल्क असून, मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे होणारे आजार, लेझरद्वारे चष्मामुक्ती तसेच ड्राय आयजबाबत तपासणी केली जाईल. रुग्णालयीतल अनुभवी डॉक्टरांच्या टीमकडून रुग्णांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शनही केले जाईल. शहरांतील विविध भागांत राहणा-या नागरिकांपर्यंत पोहोचणे स्थानिक पातळीवरील आपले स्थान भक्कम करणे हे या शिबीरामागील ‘एनआयओ आयज प्लस’ चे मुख्य उद्दिष्ट आहे. संशोधन तसेच यशस्वी उपचारपद्धतींमुळे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी जागतिक स्तरावर नावलौकिक कमावला आहे. नवीन अद्यायावत तंत्रज्ञानासह या नव्या रुग्णालयाची सुरुवात करुन संस्थेने आपल्या शंभर वर्षांहून अधिक काळ अविरतपणे सुरु असलेला गौरवशाली वारसा पुढे सुरु ठेवला आहे. रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबीरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन एनआयओ आयज प्लसच्यावतीने करण्यात आले आहे.

पत्ता: एनआयओ आयज प्लस, न्याती प्लाझा, युनिट क्र. १, ठिटे नगर, खाराडी, पुणे

कालावधी: १२ जुलै ते ३१ जुलै २०२६

शिबीराची वेळ: स. ११ वा. ते सायं. ६. वा. ३० मिनिटे.

संपर्क क्रमांक

: 49014901

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments