Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच विस्तृत बैठक -...

राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच विस्तृत बैठक – ना. चंद्रकांतदादा पाटील.

 

 

अधिकारी व नागरिकांसह केलेल्या पाहणीत आढळल्या अनेक त्रुटी – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

 

राजाराम पूल ते म्हात्रे पूल या महत्त्वाच्या डी पी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व इतर समस्या सोडविण्यासाठी मी व्यक्तिशः लक्ष घालणार असून येत्या आठवड्यात मनपा व वाहतूक पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व नागरिकांची बैठक घेऊन त्रस्त नागरिकांना दिलासा देणार असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आज नागरिक, कार्यकर्ते व मनपा अधिकाऱ्यांसह ह्या रस्त्याची पाहणी करून त्याचा वास्तुनिष्ठ अहवाल ना. चंद्रकांतदादा पाटील यांना कळविला त्यावेळी भ्रमणध्वनी द्वारे उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

ह्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता श्री. पुरुषोत्तम भूतडा, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, सरचिटणीस सर्वश्री बाळासाहेब धनवे, सुयश गोडबोले, मंडल सरचिटणीस कुणाल तोंडे, मंडल उपाध्यक्ष अनघा जगताप, ज्येष्ठ नेते राजेंद्र येडे,सामाजिक कार्यकर्त्या रुपाली मगर,उपअभियंता श्री. सचिन मेहेंदळे, क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे,उप अभियंता विनायक शिंदे कनिष्ठ अभियंता सीमा सोळंकी,कनिष्ठ अभियंता सौदामिनी रणभोर,कनिष्ठ अभियंता नीलाक्षी तडसे, यांच्या सह कृष्णा पाटील,सुनील होलबोले, निलेश घोडके,प्राचीताई तोंडे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या पाहणी दरम्यान राजाराम पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली व येथे योग्य ट्रॅफिक पोलीस असूनही कोंडी सिंहगड रस्त्यापर्यंत काही तास झाल्याचे निदर्शनास आले. एकदा सन सिटी येथून चा पूल येथे खुला करण्यात आल्यावर तर ह्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण अधिक वाढेल असे निदर्शनास आले असून येथे उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच ह्या रस्त्यावर डिव्हायडर ला अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पंक्चर केले असल्याचे दिसून आले, येथे वेगाने येणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग करण्याची सूचना करण्यात आली तर अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे तेथे उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली, अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याचे दिसून आले, अश्या ठिकाणी ताबा प्रक्रिया पूर्ण करून रस्ता रुंदीकरण करावं असेही सुचविण्यात आले, तसेच वाहतुकीला अडथळा ठरेल अशी अतिक्रमण काढणे यासह सलग रोड डिव्हायडर करणे, मातोश्री वृद्धाश्रम चौकात सिग्नल बसविणे अश्या अनेक सुधारणा सुचविण्यात आल्या. विशेष म्हणजे पंडित फार्म समोर डिव्हायडर चं नसल्याने येथील समस्ये कडे लक्ष वेधण्यात आले.

आता ना. चंद्रकांतदादांनीच ह्या विषयात लक्ष घातल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments