Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीएमडीए पुणे ची नवीन कार्यकारिणी जाहीर * अध्यक्षपदी आनंद जगदाळे

सीएमडीए पुणे ची नवीन कार्यकारिणी जाहीर * अध्यक्षपदी आनंद जगदाळे

पुणे,13 जुलै 2026 : भारतातील एकमेव आयएसओ प्रमाणित आयटी ट्रेड असोसिएशन असलेल्या कॉम्प्युटर्स ॲन्ड मीडिया डीलर्स असोसिएशन (सीएमडीए) च्या 2026-2027 वर्षासाठी नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी आनंद जगदाळे,सचिव संदीप जगदाळे,उपाध्यक्ष सीबा पाठक,खजिनदार राजेंद्र पाटील,सहसचिव शशिकांत नेवसे व सहखजिनदार विजय वाघमारे यांचा समावेश आहे.समिती सदस्यांमध्ये सचिन साळुंके,सतिश जगताप,परेश लोढा,विनय पुजारी,विक्रांत भोसले,अशोक पाटील आणि प्रीती दारणे यांचा समावेश आहे.सल्लागार समितीमध्ये जयंत शेटे,महेश मोरे व राहुल खुर्द यांचा समावेश आहे.

 

नव्याने अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारलेले आनंद जगदाळे म्हणाले की,सीएमडीए ही आयटी व्यापार क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी 34 वर्षे जुनी संस्था आहे.गेली अनेक वर्षे सीएमडीए तर्फे सदस्यांतर्फे अनेक उपक्रम हाती घेतले जातात.सीएमडीए आयटी एक्स्पो हा एक मुख्य उपक्रम असून राज्यभरातील आयटी डीलर्सना जोडणारा व माहिती तंत्रज्ञानातील अद्ययावत गोष्टी प्रदर्शित करणारा महाराष्ट्रातील आघाडीचा प्लॅटफॉर्म आहे.व्यवसाय पलीकडे जाऊन सामाजिक जबाबदारी प्रती सीएमडीए ने आपली बांधिलकी दर्शवली आहे.याअंतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये सामाजिक व शैक्षणिक संस्थांना वेळोवेळी आयटी उपकरणे दिली जातात.त्याचबरोबर व्यापाराशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे,ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्पर्धात्मक राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याच्या दृष्टीने सदस्यांना मदत करणे हे सीएमडीए तर्फे केले जाते.येत्या वर्षी आमचे लक्ष्य हे सदस्यांना अधिक सक्षम करत त्यांच्यामधील व्यावसायिक नेतृत्वाला अधिक बळ देणे आहे.हे करत असताना अर्थपूर्ण उपक्रमांद्वारे सामाजिक जागरूकता व समुदायाशी अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय सायबर सुरक्षा हे सध्या मोठे आव्हान असून त्याबाबत व्यावसायिकांसाठी वर्षभर जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सुरक्षित डिजिटल पद्धती, नवे सायबर धोके, डेटा संरक्षण, ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि सायबर हायजिन या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल.अधिक सुरक्षित डिजिटल परिसंस्थेसाठी योगदान देणे हा यामागील उद्धेश आहे ,

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments