पुणे –
HCMTR प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. पुणे मनपा माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मानले आहेत.
अनेक वर्ष रखडलेला हा प्रकल्प राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी प्रलंबित होता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्त्याचे नेटवर्क यासाठी प्राधान्य दिले एका समितीची स्थापना केली आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना दिली याच रस्त्याच्या आखणीमध्ये (alignment) पौड फाटा बालभारती रस्त्याची आखणी देखील आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी याचे सुतवाच्य केले आता हा प्रकल्प मार्गी लावणे आवश्यक झाले आहे.
बहुसंख्या जागा सरकारी मालकीची आहे अनेक ठिकाणी रस्ते झालेले आहेत टीडीआर देऊन देखील आपण ताब्यात घेतलेले आहे त्यामुळे प्राधान्याने जेव्हा काम सुरू कराल तेव्हा बालभारती रस्ता हा लगेच करता येऊ शकतो तो करावा अशी विनंती आहे.


