Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedएआय सक्षम गॅलेक्सी वाँच लवकरच भारतात; 22 जुलैला होणार अनावरण

एआय सक्षम गॅलेक्सी वाँच लवकरच भारतात; 22 जुलैला होणार अनावरण

पुणे, : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनातील वाढता वापर लक्षात घेऊन सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी इकोसिस्टममध्ये आरोग्यकेंद्रित AI अनुभव अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी २२ जुलै रोजी होणाऱ्या गँलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रमात पुढील पिढीतील गॅलेक्सी वाँच सादर करणार आहे.
हे डिव्हाइस सतत बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत राहून झोप, हालचाल, दैनंदिन अॅक्टिव्हिटी आणि इतर आरोग्यविषयक बाबींचे सातत्याने निरीक्षण करेल. एआय सक्षम इनसाइट्सच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याची अधिक चांगली माहिती मिळण्याबरोबरच, रिअल-टाइममध्ये आरोग्याचे व्यवस्थापन करण्यासही मदत होणार आहे.
सॅमसंगच्या मते, नवीन गॅलेक्सी वाँचमध्ये अधिक प्रगत अंतर्गत हार्डवेअर आणि सुधारित बॅटरीचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे आरोग्यविषयक माहिती अधिक काळ आणि अधिक अचूकपणे ट्रॅक करणे शक्य होईल. वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनात एआय अधिक सहज आणि उपयुक्त पद्धतीने समाविष्ट करण्याच्या उद्देशाने या स्मार्टवॉचची निर्मिती करण्यात आली आहे.
सॅमसंगच्या २२ जूलैला होणाऱ्या गॅलेक्सी अनपँक्ड कार्यक्रमात सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला असून, यामध्ये नवीन Galaxy Watch सह Galaxy इकोसिस्टममधील अत्याधुनिक AI नवकल्पनांची माहिती दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments