Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रँड मूल्यात 55% वाढ; भारतातील सर्वात वेगाने वाढणारा, विविध क्षेत्रात कार्यरत ब्रँड...

ब्रँड मूल्यात 55% वाढ; भारतातील सर्वात वेगाने वाढणारा, विविध क्षेत्रात कार्यरत ब्रँड म्हणून जेएसडब्ल्यू समूहाची निवड

ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 अहवालात जेएसडब्ल्यूची क्षमता विस्तार, मूल्यवर्धित उत्पादने आणि शाश्वततेवर केंद्रित गुंतवणूक यांना ब्रँड मूल्य वाढीचे प्रमुख घटक म्हणून मान्यता देण्यात आली आहे

मुंबई, 14 जुलै 2026: भारतातील वैविध्यपूर्ण समूहांमध्ये आघाडीवर असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रुपला, ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 अहवालात भारतातील सर्वात वेगाने वाढणारा समूह ब्रँड म्हणून मान्यता मिळाली आहे. या समूहाचे ब्रँड मूल्य वार्षिक 55% नी वाढून 2.3 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचले आहे. जगातील अग्रगण्य ब्रँड मूल्यांकन सल्लागार संस्था – ब्रँड फायनान्सने प्रकाशित केलेली ही क्रमवारी, क्षमता विस्तार, मूल्यवर्धित उत्पादने आणि शाश्वततेवर केंद्रित गुंतवणुकीद्वारे समूहाने बाजारपेठेतील आपले स्थान सातत्याने मजबूत केल्याचे दिसते आहे.
ही मान्यता अशा वर्षी मिळाली आहे, जेव्हा भारताच्या ब्रँडेड अर्थव्यवस्थेने उल्लेखनीय लवचिकता दर्शवली आहे. ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 अहवालानुसार, भारतातील शीर्ष 100 ब्रँड्सचे एकत्रित ब्रँड मूल्य विक्रमी 252.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले आहे; यात वार्षिक 7% वाढ झाली आहे. डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, आर्थिक समावेशन आणि विविध क्षेत्रांमधील नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सातत्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे ही वाढ शक्य झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या व्यावसायिक समूहांच्या ब्रँड्समध्ये जेएसडब्ल्यू समूहाची 55% वाढ ही सर्वात वेगवान ठरली आहे.
ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 हा अहवाल भारतातील सर्वाधिक मूल्यवान आणि शक्तिशाली अशा 100 ब्रँड्सची क्रमवारी निश्चित करतो. यामध्ये बँकिंग, माहिती तंत्रज्ञान सेवा, आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि इतर क्षेत्रांमधील दहा उप-क्षेत्रांमधील क्रमवारीचाही समावेश आहे. ब्रँड मूल्य म्हणजे खुल्या बाजारपेठेत ब्रँडचा परवाना देऊन ब्रँडच्या मालकाला मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ होय; तर ब्रँडची ताकद म्हणजे स्पर्धकांच्या तुलनेत अमूर्त निकषांवर आधारित ब्रँडच्या कामगिरीचा प्रभाव मोजण्याचे साधन होय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments