Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स तर्फे पुण्यात ₹200 कोटींच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर आधारित मिश्र-वापर प्रकल्पाची...

क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स तर्फे पुण्यात ₹200 कोटींच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर आधारित मिश्र-वापर प्रकल्पाची घोषणा

रिअल इस्टेटमधील मालकी हक्क आणि प्रोफेशनल हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापनाची सांगड घालणारी ‘हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एचआयपी) ही अभिनव गुंतवणूक संकल्पना सादर

~ सीएलएसतर्फे अरिस्टा डेव्हलपर्स आणि अलिव्हा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांच्या भागीदारीने 200 खोल्यांचा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर आधारित आधारित मिश्र-वापर प्रकल्प ~

पुणे, महाराष्ट्र : दिव्यास्री समूहाची कंपनी आणि भारतातील आघाडीच्या व्यवस्थापित निवासी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्सने (सीएलएस) पुण्यातील आपल्या पहिल्या हॉस्पिटॅलिटी-आधारित मिश्र-वापर प्रकल्पाची घोषणा केली आहे. या घोषणेसह कंपनीने हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर आधारित रिअल इस्टेट क्षेत्रात धोरणात्मक प्रवेश केला आहे. ₹200 कोटींच्या या प्रकल्पामध्ये 200 खोल्यांचे हॉस्पिटॅलिटी प्रकल्प, प्रीमियम रिटेल स्पेसेस आणि ब्रँडेड रेसिडेन्सेसचा समावेश असून पूर्व पुण्यातील कोरेगाव पार्क ॲनेक्स परिसरात हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.

सीएलएस आणि दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या पुण्यातील अरिस्टा डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. अलिव्हा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे दीर्घकालीन मास्टर लीज कराराअंतर्गत या प्रकल्पाचे व्यावसायिक व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

बालेवाडी येथे ‘कोडनेम EMI’ प्रकल्पाच्या यशस्वी लाँचनंतर CLSच्या विस्तार धोरणातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून, पुण्यातील विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील कंपनीची उपस्थिती यामुळे अधिक मजबूत होणार आहे.

बालेवाडी येथे ‘कोडनेम ईएमआय’ प्रकल्पाच्या यशस्वी लाँचनंतर सीएलएसच्या विस्तार धोरणातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून, पुण्यातील विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील कंपनीची उपस्थिती यामुळे अधिक मजबूत होणार आहे.

पूर्व पुण्यातील कोरेगाव पार्कलगत मुंढवा येथे हा प्रकल्प विकसित करण्यात येत असून खराडी, मगरपट्टा सिटी, हडपसर, कल्याणी नगर, विमान नगर, ईओएन आयटी पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर, पुणे आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी या प्रकल्पाची उत्तम जोडणी आहे.

व्यवसायानिमित्त प्रवास करणारे, सल्लागार, परदेशी व्यावसायिक आणि दीर्घकाळ मुक्काम करणारे कॉर्पोरेट पाहुणे यांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेऊन या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. हॉस्पिटॅलिटी सुविधा, रिटेल स्पेसेस आणि ब्रँडेड रेसिडेन्सेस यांचा समावेश असलेली व्यावसायिक व्यवस्थापनाखालील मिश्र-वापर परिसंस्था या प्रकल्पात उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या लाँचसोबतच सीएलएसने ‘हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एचआयपी) ही अभिनव गुंतवणूक संकल्पनाही सादर केली आहे. व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित हॉस्पिटॅलिटी मालमत्तांमध्ये गुंतवणूक अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ही कंपनीची स्वतंत्र गुंतवणूक चौकट विकसित करण्यात आली आहे. एचआयपी मॉडेलनुसार गुंतवणूकदार संबंधित हॉस्पिटॅलिटी युनिट्सचे मालक असतील; तर हॉटेलचे दैनंदिन व्यवस्थापन, पाहुण्यांना सेवा, उत्पन्नाचे व्यवस्थापन, देखभाल आणि ब्रँडचे संचालन अलिव्हा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सतर्फे करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प बिल्ड-सेल-लीजबॅक मॉडेलवर आधारित असून 29 वर्षांच्या दीर्घकालीन मास्टर लीज कराराद्वारे त्याला पाठबळ देण्यात आले आहे. या करारामध्ये 12 वर्षांचा लॉक-इन कालावधी समाविष्ट करण्यात आला असून त्यामुळे गुंतवणूकदारांना दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी न घेता व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित मालकीचा अनुभव मिळणार आहे.

पूर्व पुण्यात कॉर्पोरेट प्रवास, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी), आयटी सेवा, सल्लागार कंपन्या आणि दीर्घकालीन व्यावसायिक मुक्कामाच्या मागणीत सातत्याने वाढ होत असतानाच हा प्रकल्प सादर करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क, खराडी, मगरपट्टा आणि हडपसर या परिसरांना पुण्यातील प्रमुख हॉस्पिटॅलिटी बाजारपेठ म्हणून स्थान प्राप्त झाले असून व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित निवास व्यवस्था आणि संस्थात्मक दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी मालमत्तांची मागणी येथे सातत्याने वाढत आहे.

यावेळी बोलताना क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जय किशन चल्ला म्हणाले, “ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उदयास येणाऱ्या रिअल इस्टेट संधी ओळखण्यावर सीएलएसने नेहमीच भर दिला आहे. भारतात हॉस्पिटॅलिटी हे रिअल इस्टेटमधील सर्वाधिक आशादायी अॅसेट क्लासपैकी एक म्हणून वेगाने विकसित होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि ब्रँडेड रेसिडेन्सेस यांची एकाच इकोसिस्टीममध्ये सांगड घालत व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित मिश्र-वापर प्रकल्पाच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रवेश करत आहोत.

यासोबतच आम्ही ‘हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एचआयपी) ही आमची संरचित गुंतवणूक चौकटही सादर करत आहोत. या माध्यमातून गुंतवणूकदारांना हॉस्पिटॅलिटी प्रकल्पांचे प्रत्यक्ष संचालन करण्याची गुंतागुंत टाळून व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित हॉस्पिटॅलिटी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्यावसायिक व्यवस्थापनाखाली उत्पन्न देणाऱ्या रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे आजचे गुंतवणूकदार अधिक आकर्षित होत असून हे मॉडेल त्यांच्या बदलत्या अपेक्षांशी सुसंगत असल्याचा आम्हाला विश्वास आहे.”

या भागीदारीबाबत बोलताना अरिस्टा डेव्हलपर्सचे संचालक विजय अडवाणी म्हणाले, “पूर्व पुण्याचा परिसर भारतातील सर्वाधिक गतिमान व्यावसायिक केंद्रांपैकी एक म्हणून विकसित झाला असून त्यामुळे उच्च दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी सुविधांची मागणी सातत्याने वाढत आहे. सीएलएससोबतच्या या भागीदारीमुळे स्थानिक विकासातील आमचे कौशल्य आणि संस्थात्मक प्रकल्प नियोजन यांची सांगड घालण्यात येत आहे. या माध्यमातून गुंतवणूकदार आणि व्यावसायिक प्रवासी या दोघांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारा एक महत्त्वपूर्ण मिश्र-वापर प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे.”

अलिव्हा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक आणि चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विक्रमजीत सिंग म्हणाले, “पाहुण्यांच्या अपेक्षा सातत्याने बदलत असल्यामुळे व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित हॉस्पिटॅलिटी मालमत्तांचे महत्त्व वाढत आहे. पाहुण्यांचा अनुभव, ऑक्युपन्सी वाढवणे, रेव्हेन्यू ऑप्टिमायझेशन आणि सेवा वितरण अशा प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम कार्यक्षमता सुनिश्चित करण्याची जबाबदारी आमची आहे. सीएलएस आणि अरिस्टा डेव्हलपर्स यांच्या भागीदारीत या क्षेत्रासाठी नवे मापदंड प्रस्थापित करणारे व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित हॉस्पिटॅलिटी ठिकाण विकसित करण्यात आम्हाला आनंद होत आहे.”

या प्रकल्पामुळे सीएलएसच्या व्यवस्थापित निवासी पोर्टफोलिओला आणखी बळ मिळणार आहे. सध्या पुणे, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थी निवास, को-लिव्हिंग, इंडस्ट्रिअल हाउसिंग आणि व्यवस्थापित निवासी प्रकल्पांमध्ये कंपनीकडे 13,000हून अधिक व्यवस्थापित बेड्स आहेत.

पुण्यातील या पहिल्या हॉस्पिटॅलिटी-आधारित मिश्र-वापर प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थात्मक दर्जाची हॉस्पिटॅलिटी परिसंस्था उभारण्याबरोबरच व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित गुंतवणूक मॉडेल सादर करणे हा सीएलएसचा उद्देश आहे. या माध्यमातून भारतातील वाढत्या हॉस्पिटॅलिटी रिअल इस्टेट क्षेत्रात व्यक्ती गुंतवणूक करण्याच्या पद्धतीला नवे स्वरूप देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडविषयी

क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (सीएलएस) हा व्यवस्थापित निवासी क्षेत्रातील आघाडीचा प्लॅटफॉर्म असून विद्यार्थी निवास, को-लिव्हिंग, इंडस्ट्रिअल हाउसिंग आणि व्यवस्थापित निवासी समुदायांमध्ये संस्थात्मक दर्जाच्या रिअल इस्टेट मालमत्तांचा विकास आणि संचालन करण्यावर कंपनीचा भर आहे. या कंपनीतर्फे भारतातील प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थी, प्रोफेशनल्स, व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित निवास सुविधा विकसित करण्यात येतात.

अरिस्टा डेव्हलपर्सविषयी

अरिस्टा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही 2005मध्ये स्थापन झालेली पुणेस्थित रिअल इस्टेट कंपनी असून निवासी, व्यावसायिक, लक्झरी हाउसिंग आणि आयटी प्रकल्प विकसित करण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. 6 लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाचे रिअल इस्टेट प्रकल्प पूर्ण केलेल्या या कंपनीतर्फे दर्जेदार बांधकाम, विचारपूर्वक डिझाइन, कार्यक्षम अभियांत्रिकी आणि पारदर्शक व्यावसायिक कारभारावर भर देण्यात येतो. ग्राहक आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारे प्रकल्प विकसित करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.

अलिव्हा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सविषयी

अलिव्हा हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स हा उच्च दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी सेवा देणारा ब्रँड असून समकालीन डिझाइन, वैयक्तिक गरजांनुसार सेवा आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित हॉटेलचा अनुभव देण्यावर त्यांचा भर आहे. भारतातील विविध शहरांमध्ये विस्तारत असलेल्या या ब्रँडचा व्यवसाय आणि पर्यटन या दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी दर्जेदार हॉस्पिटॅलिटी ठिकाणे विकसित करण्यावर भर असून सातत्यपूर्ण सेवा गुणवत्ता आणि उत्कृष्ट पाहुणचाराचा अनुभव कायम राखण्यास कंपनी वचनबद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments