Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरीतील ‘डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वरदान; २,२०० शस्त्रक्रियांचा टप्पा पार!...

पिंपरीतील ‘डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वरदान; २,२०० शस्त्रक्रियांचा टप्पा पार! दोन दिवसांच्या नवजात बालकापासून ९२ वर्षांच्या वृद्धावर यशस्वी उपचार

पिंपरी, , पुणे यांनी २,२०० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून प्रगत आणि सर्वसमावेशक हृदयविकार उपचार क्षेत्रातील आपले अग्रस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या यशामागील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हॉस्पिटलची एकाच केंद्रात, एकाच समर्पित टीमद्वारे उपचार करण्याची पद्धत. अनुभवी हृदय शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ, शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित ठेवणारे तंत्रज्ञ, परिचारिका कर्मचारी आणि पुनर्वसन तज्ज्ञ एकाच छताखाली समन्वयाने कार्य करतात. यामुळे उपचारांमध्ये सातत्य, समन्वित कार्यपद्धती आणि उत्कृष्ट परिणाम साध्य झाले आहेत.
हॉस्पिटलच्या हृदय व संवाहिन्या शल्यचिकित्सा (CVTS) विभागाने नियमित हृदय शस्त्रक्रियांपासून ते अत्यंत गुंतागुंतीच्या आणि उच्च जोखमीच्या शस्त्रक्रिया प्रौढ तसेच बालरुग्णांमध्ये यशस्वीरित्या केल्या आहेत. २,२०० हून अधिक शस्त्रक्रियांपैकी ५०० पेक्षा अधिक बालहृदय शस्त्रक्रिया असून, त्यात केवळ १.८ किलोग्रॅम वजनाच्या नवजात बालकांवरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या टीमने केवळ २ दिवसांच्या नवजात बालकापासून ते ९२ वर्षांच्या ज्येष्ठ रुग्णांपर्यंत सर्व वयोगटांतील रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
याशिवाय, हॉस्पिटलमध्ये सुमारे १,८०० थोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या करण्यात आल्या असून, त्यामुळे सर्वसमावेशक कार्डिओथोरॅसिक आणि रक्तवाहिन्यांच्या उपचारांमध्ये हॉस्पिटलचे कौशल्य अधिक दृढ झाले आहे.
सध्या हे केंद्र कमीतकमी चिरफाड करून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया (मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डिअॅक सर्जरी), जटिल जन्मजात हृदय शस्त्रक्रिया, झडप दुरुस्ती व बदल (Valve Repair & Replacement), तसेच महाधमनीवरील (Aortic) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नियमितपणे करत आहे. संस्थेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या प्रवासात हृदय व वक्षशल्यचिकित्सा विभाग (Cardiovascular and Thoracic Surgery – CVTS) हा एक महत्त्वपूर्ण घटक राहिला असून, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant) आणि ईसीएमओ (Extracorporeal Membrane Oxygenation – ECMO) कार्यक्रम अधिक सक्षम करण्यामध्ये या विभागाने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या हृदयरोगांवरील उपचार करण्याची रुग्णालयाची क्षमता आणखी बळकट झाली आहे.
याप्रसंगी डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “डीपीयूमध्ये आमचे ध्येय नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय कौशल्य आणि नैतिक मूल्यांवर आधारित आरोग्यसेवा उभारण्याचे राहिले आहे. २,२०० हून अधिक हृदय शस्त्रक्रियांचा टप्पा गाठणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, रुग्णांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे ते प्रतीक आहे.”
डॉ. (सौ.) भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाल्या, “अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, समर्पित कार्डिअॅक आयसीयू आणि आधुनिक क्रिटिकल केअर सुविधांच्या बळावर डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे, महाराष्ट्र आणि देशभरातील रुग्णांसाठी प्रगत हृदयविकार उपचारांचे विश्वासार्ह केंद्र म्हणून अधिक सक्षम होत आहे. जागतिक दर्जाचे उपचार आणि संवेदनशील सेवा देणारे उत्कृष्ट केंद्र उभारल्याबद्दल आमच्या कार्डिअॅक टीमचा आम्हाला अभिमान आहे.”
डॉ. रेखा अर्कोट, अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे म्हणाल्या, “हा टप्पा केवळ शस्त्रक्रियेमधील उत्कृष्टतेचे प्रतीक नसून, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उभारलेल्या एकात्मिक आरोग्यसेवा व्यवस्थेचेही द्योतक आहे. शल्यचिकित्सक, अतिदक्षता वैद्यकीय पथक, परिचारिका, तंत्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळेच हे उल्लेखनीय यश शक्य झाले आहे.”
या यशाबद्दल बोलताना डॉ. अनुराग गर्ग, प्राध्यापक व विभागप्रमुख, हृदय व संवाहिन्या शल्यचिकित्सा विभाग डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे म्हणाले, “२,२०० हून अधिक हृदय शस्त्रक्रियांचा टप्पा गाठणे हे आमच्या संपूर्ण हृदयविकार तज्ज्ञ टीमच्या समर्पणाचे आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाचे प्रतीक आहे. अत्याधुनिक सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि पूर्णवेळ बहुविद्याशाखीय तज्ज्ञांची एकत्रित टीम यामुळे आम्ही नवजात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया आत्मविश्वासाने आणि अचूकतेने पार पाडू शकतो.”
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे विषयी
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे हे भारतातील अग्रगण्य सुपर स्पेशालिटी रुग्णालयांपैकी एक असून, देशांतर्गत तसेच परदेशातील रुग्णांनाही उपचार सेवा पुरवते. गेली तीन दशके हे रुग्णालय करुणामय, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी कार्यरत आहे. सुमारे ९,७७,७५७ चौ. फूट परिसरात विस्तारलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि आधुनिक जीवनरक्षक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे. २,००० हून अधिक खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात विविध वैद्यकीय शाखा, सुपर स्पेशालिटीज आणि उत्कृष्टता केंद्रांद्वारे सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments