Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात एसीएमएची पहिली क्लस्टर परिषद संपन्न

पुण्यात एसीएमएची पहिली क्लस्टर परिषद संपन्न

पुणे,16 जुलै 2026 : एसीएमए मोबिलिटी फाउंडेशन तर्फे नुकतेच ‌‘बिल्डिंग वर्ल्ड-क्लास ऑटोमोटिव्ह सप्लाय चेन – द एसीएमए वे‌‘ या संकल्पनेवर आधारित पहिल्या क्लस्टर परिषद 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेद्वारे एसीएमए क्लस्टर मुव्हमेंटच्या 25 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाने भारतीय ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट उद्योगात कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा, उद्योगांमधील सहकार्य आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ह्युंदाई मोटर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग,विशेष अतिथी म्हणून स्विच मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मणी तसेच एसीएमएचे अध्यक्ष विक्रमपती सिंघानिया, एसीएमएचे नियुक्त अध्यक्ष श्रीराम विजी आणि एसीएमएचे सरसंचालक विनी मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

एसीएमए चे अध्यक्ष व जेके फेनर (इंडिया) लि.चे व्यवस्थापकीय संचालक विक्रमपती सिंघानिया म्हणाले की,25 वर्षांपूर्वी एसीएमए ने एक साधा पण परिवर्तनशील निर्णय घेतला. कंपन्यांना एकमेकांपेक्षा श्रेष्ठ बनण्यास सांगण्यापेक्षा एकमेकांच्या सहकार्याने अधिक सक्षम बनविण्याचे आवाहन केले. या विचारातूनच एसीएमए क्लस्टर मुव्हमेंटचा जन्म झाला व हे कालांतराने सहकार्य,नवे मापदंड आणि निरंतर सुधारणेच्या संस्कृतीत विकसित झाले.

उद्योगाच्या प्रगतीवर प्रकाश टाकत ते म्हणाले की,भारतीय ऑटो कॉम्पोनंट उद्योगाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.6 लाख कोटी रूपयांची उलाढाल ओलांडली असून निर्यात 24 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. ही कामगिरी भारतीय उत्पादनावरील वाढता जागतिक विश्वास दर्शवत आहे.मात्र नेतृत्व टिकून ठेवण्यासाठी अभियांत्रिकी,उत्पादन उत्कृष्टता,गुणवत्ता,अभिनवता आणि मनुष्यबळात सातत्यपूर्ण गुंतवणूकीची आवश्यकता असेल.

एसीएमएचे नियुक्त अध्यक्ष व ब्रेक्स इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम विजी म्हणाले की,भारत जागतिक उत्पादनात आपले स्थान मजबूत करत असताना जागतिक दर्जाच्या पुरवठा साखळ्या तयार करण्यासाठी उद्योग,सरकार आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये अधिक जवळच्या सहकार्याची आवश्यकता असेल.एसीएमए क्लस्टर मुव्हमेंट उत्पादकांना विशेषत: एमएसएमई उद्योगांना गुणवत्ता,डिजिटलायझेशन आणि सातत्यपूर्ण क्षमता विकासाद्वारे स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या परिषदेत भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे (एमएसएमई) सहसचिव (प्रशासन व तंत्रज्ञान) विनम्र मिश्रा यांचे बीजभाषण झाले. तसेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी, व्हीई कमर्शियल व्हेईकल्स, जेएसडब्ल्यू मोटर्स, टीव्हीएस मोटर कंपनी आणि कमिन्स इंडिया यांच्या खरेदी व धोरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेल्या विशेष परिसंवादात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ऑटोमोटिव्ह पुरवठा साखळीच्या भविष्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

रौप्य महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून एसीएमए ने क्लस्टर मुव्हमेंटच्या 25 वर्षांच्या प्रवासावर आधारित इम्पॅक्ट ची विशेष आवृत्ती प्रकाशित केली.तसेच उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि निरंतर सुधारणेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्लस्टर स्टार परफॉर्मर कंपन्यांचा गौरव केला.

एसीएमए (द ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया) चे सरसंचालक विनी मेहता म्हणाले की,देशांतर्गत असलेली भक्कम मागणी,तंत्रज्ञानातील निरंतर गुंतवणूक आणि जागतिक ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर वित्तीय वर्ष 2026 मध्ये भारताच्या ऑटोकॉम्पोनंट उद्योगाची लवचिकता आणि क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये बदल होत असताना एक विश्वासार्ह उत्पादन भागीदार म्हणून भारत आपली स्थिती अधिक बळकट करत आहे.एसीएमए क्लस्टर मुव्हमेंट हे सातत्याने सिध्द करत आहे की,परस्पर सहकार्य आणि निरंतर क्षमता सुधारणा ही स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या वाहन पुरवठा साखळ्या उभारण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

पुण्यात ही परिषद होणे म्हणजे वाहन उत्पादन क्षेत्रात योगदान देत असलेल्या शहराचे महत्त्व अधोरेखित होते. चार हजारांहून अधिक ऑटोमोटिव्ह आणि ॲन्सिलरी उद्योगांचे केंद्र असलेले पुणे आज अभियांत्रिकी कौशल्य, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि उद्योगांमधील सहकार्याच्या माध्यमातून क्षमता विकासाचे प्रमुख केंद्र बनले आहे. इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) तंत्रज्ञानातील झपाट्याने होत असलेली प्रगती, जागतिक दर्जाच्या संशोधन व विकास तसेच चाचणी क्षमता आणि इंडस्ट्री 4.0 आधारित उत्पादन पद्धतींचा अवलंब यामुळे पुणे शहर भारताच्या ऑटोमोटिव्ह सप्लाय चेन क्षेत्रातील परिवर्तनाला गती देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments