Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedनामदेवराव जाधव यांच्या विरोधात पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन...

नामदेवराव जाधव यांच्या विरोधात पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन २४ तासाच्या आत कारवाई करा – उषामाई कांबळे

पिंपरी-चिंचवड(प्रतिनिध) दिनांक १६ जुलै २०२६:- निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ललिता काळे या पीडित महिलेने प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात २५ हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून, शिवशाही शासन पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उषामाई कांबळे यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत निगडी पोलीस प्रशासने २४ तासांच्या आत कठोर कारवाई करावी अशी मागणी मेल द्वारे केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की,संबंधित पीडित महिलेने प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, तक्रार दाखल होऊन बराच कालावधी उलटूनही पोलिसांकडून कोणतीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे पीडितेचा न्याय मिळण्याचा मार्ग लांबणीवर पडला आहे.या दिरंगाईमुळे समाजात तीव्र असंतोष पसरला असून, शिवशाही शासन पक्ष महिला आघाडीने या प्रकरणाला आता उचलून धरले आहे.

कांबळे यांनी निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही निवेदनाद्वारे सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी.नियमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीला कायद्याच्या वर समजले जाऊ नये. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुढील २४ तासांत कार्यवाही करावी आणि त्याबाबत लेखी माहिती द्यावी.या निवेदनाच्या प्रती पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगालाही पाठवण्यात आल्या आहेत. आता पोलीस प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments