Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमौजे लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द*

मौजे लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द*

पुणे, दि. १६ : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळांसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेला आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केला आहे.

लोणावळा ग्रामीण परिसरातील एकवीरा देवी मंदिर, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा व तुंग किल्ले, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण आदी पर्यटनस्थळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कलम १६३ लागू करण्यात आले होते.

मात्र, सध्या पावसाचा वेग कमी झाला असून जनजीवन सुरळीत सुरू असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन ६ जुलै २०२६ रोजीचा आदेश रद्द करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments