Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्यूब हायवेज ट्रस्टने इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसाठी (IPO) प्राइस बँड जाहीर केला; इश्यू...

क्यूब हायवेज ट्रस्टने इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसाठी (IPO) प्राइस बँड जाहीर केला; इश्यू 22 जुलै 2026 रोजी खुला होणार

नवी दिल्ली, 15 जुलै 2026 | क्यूब हायवेज फंड ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड (इन्व्हेस्टमेंट मॅनेजर) द्वारे व्यवस्थापित क्यूब हायवेज ट्रस्टने (“क्यूब इनव्हिट”) [NSE/BSE: CUBEINVIT/543899] आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO किंवा “ऑफर”) साठी प्राइस बँड आज जाहीर केला आहे. ही संस्था एका खासगीरित्या सूचीबद्ध इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट (InvIT) मधून सार्वजनिकरित्या सूचीबद्ध InvIT मध्ये रूपांतरित होत आहे.

या ऑफरसाठी प्राइस बँड प्रति युनिट ₹151 ते ₹152 असा निश्चित करण्यात आला आहे. या ऑफरमध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत जास्तीत जास्त ‘xx’ युनिट्सची विक्री समाविष्ट असून, त्याचे एकूण मूल्य ₹5,000 कोटींपर्यंत असू शकते.

ही बोली/ऑफर बुधवार, 22 जुलै 2026 रोजी सुरू होईल आणि शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी बंद होईल. बोलीदार (अँकर गुंतवणूकदार आणि धोरणात्मक गुंतवणूकदार यांच्याव्यतिरिक्त) किमान 95 युनिट्ससाठी आणि त्यानंतर 95 युनिट्सच्या पटीत बोली लावू शकतात.

या ट्रस्टने 13 जुलै 2026 रोजी धोरणात्मक गुंतवणूकदारांशी युनिट सबस्क्रिप्शन करार देखील केले आहेत. या करारांनुसार, धोरणात्मक गुंतवणूकदार ऑफर अटींच्या अधीन राहून, प्रति युनिट ₹152 पर्यंतच्या वाटप दराने 8,22,36,840 युनिट्स खरेदी करण्यास तयार झाले आहेत; याचे एकूण मूल्य ₹12,500 दशलक्ष (₹1,250 कोटी) इतके आहे.

धोरणात्मक गुंतवणूकदार पुढीलप्रमाणे:

प्राझिम ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड – 62,500,000 युनिट्स, ज्यांचे एकूण मूल्य 9,500 दशलक्ष रुपये (950 कोटी) पर्यंत आहे.
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – 6,578,947 युनिट्स, ज्यांचे एकूण मूल्य 1,000 दशलक्ष रुपये (100 कोटी) पर्यंत आहे.
एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड – 6,578,947 युनिट्स, ज्यांचे एकूण मूल्य १,००० दशलक्ष रुपये (100 कोटी) पर्यंत आहे.
ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लिमिटेड – 3,289,473 युनिट्स, ज्यांचे एकूण मूल्य 500 दशलक्ष रुपये (50 कोटी) पर्यंत आहे.
व्हाइटओक कॅपिटल REIT & InvIT अल्टरनेटिव्ह्ज फंड I – 3,289,473 युनिट्स, ज्यांचे एकूण मूल्य 500 दशलक्ष रुपये (50 कोटी) पर्यंत आहे.

सेबी (पायाभूत सुविधा गुंतवणूक विश्वस्त) विनियम, २०१४ आणि पायाभूत सुविधा गुंतवणूक विश्वस्तांसाठीच्या सेबी मास्टर परिपत्रकाच्या लागू तरतुदींनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे.

या ट्रस्टचे प्रायोजक क्यूब हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर व्ही. प्रा. लि. आहेत आणि ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड विश्वस्त आहेत.

या ऑफरचे बूक-रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे आहेत.

या ऑफरचे रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे आहेत. ट्रस्ट आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजरचे देशांतर्गत कायदेशीर सल्लागार सिरिल अमरचंद मंगलदास हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments