पुणे : पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांचा जन्मदिन सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात आयोजित या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव जितेंद्र पितळिया, प्राचार्या आर्किटेक्ट सुचिता सयाजी, उपप्राचार्या डॉ. वंदना पुसाळकर, महेंद्र छाजेड, विजय ओसवाल, अपूर्वा छाजेड, निर्मय छाजेड आणि पियुष शहा उपस्थित होते.
उपक्रमाअंतर्गत स्थानिक जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन आणि लागवड किती महत्त्वाची आहे, याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला
या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी आर्किटेक्ट शेखर गरुड यांचे मोलाचे योगदान लाभले. वृक्षारोपण उपक्रमाचे नेतृत्व आर्किटेक्ट विजया श्रीनिवासन आणि आर्किटेक्ट मधुरा रायरीकर यांनी केले. रक्तदान शिबिरालाही विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


