Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedनागरी सहकारी बँकांसाठी ‘मिशन सक्षम’ उपक्रम

नागरी सहकारी बँकांसाठी ‘मिशन सक्षम’ उपक्रम

पुणे: दि. १७ जुलै २०२६
आरबीआयच्या ‘सक्षम’ मिशनचा उद्देश नागरी सहकारी बँकांमधील (UCBs) प्रशासन, जोखीम व्यवस्थापन, हमी/अनुपालन कार्ये, कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञान अवलंब (आयटी/सायबर सुरक्षेसह) यांच्या क्षमतांमधील त्रुटी दूर करणे हा आहे. सदर मिशन नागरी सहकारी बँकांच्या विकासाचा पुढील टप्पा सुरक्षित करण्यास, अधिक सक्षम कौशल्यं व क्षमता विकसित करण्यास आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करेल.
आपल्या ‘सक्षम’ मिशनचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दि. १७ जुलै २०२६ रोजी पुणे येथील कॉसमॉस को-ऑप बँक लि. च्या सहकार सभागृहात एक व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. नागरी सहकारी बँकांचे (UCBs) संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे ज्ञान आणि क्षमता वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील ४५ नागरी सहकारी बँकांमधील १८० अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मंडळाचे सदस्य, व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुशासनाच्या माध्यमातून संचालक मंडळाची परिणामकारकता वाढविणे या विषयाने प्रशिक्षण सत्राची सुरुवात भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाव्यवस्थापक श्री. पवन कुमार पंडीत यांनी केली. या सत्रात सुयोग्य निर्णय क्षमता, उत्तरदायित्व आणि शाश्वत संस्थात्मक वाढीस चालना देण्यासाठी प्रभावी प्रशासनाची भूमिका कशी महत्वपूर्ण आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाव्यवस्थापक श्री. मनीष कुमार यांनी संवेदनशील बँकिंगसाठी आश्वासक आणि जोखीम देखरेख भक्कम करणे या विषयावर आपल्या सत्रात माहिती दिली. संस्थात्मक लवचिकता भक्कम करण्यासाठी आश्वासक आणि सक्रिय जोखीम देखरेखीचे महत्व अधोरेखित केले.
सीएबी, पुणे येथील उपमहाव्यवस्थापक आणि एम.ओ.एफ श्री. अभिषेक कुमार यांनी एका अत्यंत संवादात्मक सत्रात नागरी सहकारी बँकांमध्ये भक्कम अशी क्रेडिट रिस्क कल्चर निर्माण करण्यावर भर दिला.
कस्टमर ड्यू डिलिजन्स – मूलतत्वे आणि सर्वोत्तम पध्दती या विषयावरील सत्रात श्रीमती माला शिरीष लाल, उपमहाव्यवस्थापक आणि एम.एफ.ओ (सीएबी, पुणे) यांनी वाढत्या डिजिटल बँकिंग वातावरणात आपला ग्राहक ओळखा (नो युअर कस्टमर) प्रक्रिया आणि अँटी मनी लाँडरिंग यांच्या देखरेखीच्या वाढत चाललेल्या महत्वावर भर दिला. बँकेचे आणि ग्राहकांचे हीत जपण्यासाठी बँकांनी सर्वोत्तम पध्दती अवलंबल्या पाहिजेत, अशा व्यावहारिक सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल त्यांनी माहिती दिली.
श्री. के. सुरेशकुमार, महाव्यवस्थापक आणि एम.एफ.ओ (सीएबी, पुणे) यांनी आगामी काळातील सायबर धोके, नियामक मार्गदर्शक तत्वे याविषयावरील कार्यक्रमाच्या सत्राचे संचालन केले. सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी नियमित तांत्रिक अद्ययावतीकरण आणि सतत देखरेखीचे महत्व यावर त्यांनी भर दिला.
कॉसमॉस को-ऑप बँक लि. च्या सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला, ज्याद्वारे नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात सुशासन, नियामक अनुपालन, जोखीम व्यवस्थापन आणि संस्थात्मक सहज सोपी सुरक्षित कार्यप्रणाली भक्कम करण्याच्या आरबीआयच्या वचनबध्दतेची पुष्टी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments