Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोदी सरकार 'संविधान विरोधी' असल्याचा वारंवार प्रत्यय.. एनडीए मित्र पक्षांनी वेळेत बोध...

मोदी सरकार ‘संविधान विरोधी’ असल्याचा वारंवार प्रत्यय.. एनडीए मित्र पक्षांनी वेळेत बोध घ्यावा ..! – काँग्रेस’ची प्रखर टिका व ‘एनडीए घटक पक्षां’ना ईंशारा..! शिक्षण मंत्र्याना वाचवण्यात मोदी सरकार’चा भ्रष्टाचारी चेहरा उघड ..! – काँग्रेस वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि – १९ जुलै २६
लडाख येथील पर्यावरण वादी सामाजिक कार्यकर्ते व वैज्ञानिक संशोधक सोनम वांगचुक यांचे नीट पेपर फुटी व २० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विषयी जबाबदार शिक्षण मंत्री राजीनामा देणे बाबत, सतत १९ दिवस
लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने दिल्ली, जंतर-मंतर वरील, शांततेने चाललेले ‘सत्त्यागह आंदोलन ‘केंद्र सरकारने’ उच्च न्यायालयाचे कारण पुढे करून, पोलीसां करवी, काल सकाळी अक्षरशः दडपण्याचा निंद्य प्रकार केला. त्यामुळे मोदी सरकारची संविधानीक लोकशाही मुल्ये पायदळी तुडवण्याची मनमानी व अहंकारी वृत्ती पुन्हा दिसून आली असून, मोदी सरकारची संविधान विरोधी भुमिका स्पष्ट झाली असल्याची प्रखर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, सोनम वांगचुक व क्राक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी वास्तविक (काश्मीर ३७० कलम, नवे शैक्षणिक धोरण इ बाबींमध्ये विद्यमान मोदी सरकारला अनुकूल व समर्पक भुमिका घेतल्याची पार्शभुमि असतांना ही, ‘वारंवार पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे’ सोनम वांगचुक वा अभिजीत दिपके यांची ‘शिक्षण मंत्र्यांच्या राजीवाम्याची’ व युवा पिढी विषयी राजकीय उत्तरदाईत्वाची रास्त मागणी करण्याचे उपोषण आंदोलन माध्यमातून ‘लोक जागृती’ची चळवळ सुरु केल्यावर काँग्रेस, सपा सह विविध राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून, मोदी सरकारची पोलखोल होण्याच्या धास्तीनेच खाजगी हाँस्पीटल चा स्टाफ व पोलीसांचे खाजगी वेषात अचानक सकाळी येऊन वांगचुक यांना अक्षरशः उचलून नेले व सदर लोकशाही मार्गाने सुरु असलेले आंदोलन चिरडून काढण्याची अचानक पावले उचलली.
आंदोलन चिरडण्याचा मोदी सराकपच ‘लोकशाही तील संविधानीक मुल्यांचे विरोधी’ (रवैया) वागणुक स्पष्ट होते असल्याने सरकारच्या आंदोलन चिरडण्याचा भुमिकेचा तिव्र धिक्कार करत असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे.
मोदी सरकारच्या ‘मनमानी व अतिरेकी वागणुकीचा किमान बोध’ एनडीए मधील घटक पक्षांनी गांभीर्याने व तातडीने घ्यावा अन्यथा वेळ निघुन गेल्यास, मुळात कर्ज बाजारी झालेला देश व अनेक संकटाच्या ऱ्गर्त्तेत जाईल व यास महायुती व एनडीए मधील मित्र पक्ष जबाबदार राहतील असा निर्वाणीचा ईशारा ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात दिला..!
—————–///————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments