पुणे, २३ जुलै २०२६: फोर्स मोटर्स कंपनीने आज नवीन अर्बेनिया डिलक्स पुण्यासह देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये दाखल केली. ही व्हेईकल तिच्या नेक्स्ट-जनरेशन शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्मची नवीन प्रीमियम उत्पादन श्रेणी आहे. अर्बेनिया प्लॅटफॉर्मच्या यशावर आधारित नवीन अर्बेनिया डिलक्स अधिक उत्कृष्ट प्रीमियम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. भारतातील पहिले पूर्णपणे पायाभूत मोड्यूलर मोनोकॉक व्हॅन प्लॅटफॉर्म म्हणून लाँच केलेल्या अर्बेनियाने प्रीमियम सामायिक प्रवासी वाहतुकीमध्ये नवीन मापदंड निर्माण केला.
नव्या वाहनात प्रवाशांची सोय केंद्रस्थानी ठेवून सुधारित कामगिरी, प्रीमियम इंटीरिअर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. या लाँचसह, नवीन अर्बेनिया डिलक्स सध्याच्या पिढीतील अर्बेनियाची जागा घेईल आणि प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी क्षेत्रात फोर्स मोटर्सचे मानक उत्पादन बनेल.
नवीन अर्बेनिया डिलक्सच्या लाँचबाबत मत व्यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले,“नवीन अर्बेनिया डिलक्सच्या लाँचसह आम्ही ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म सुधारित कार्यक्षमता, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानासह नवीन स्तरावर घेऊन जात आहोत. प्रीमियम मोबिलिटी क्षेत्र सातत्याने विकसित होत असताना आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय, सुरक्षितता व कामगिरी यामध्ये नवीन मावदंड निर्माण करणारे मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
नवीन अर्बेनिया डिलक्स तीन व्हीलबेसेस आणि ९+डी ते १६+डी सीटींग कॉन्फिग्युरेशन्ससह आठ सीटींग लेआउट्समध्ये संपूर्ण भारतातील फोर्स मोटर्सच्या डीलर नेटवर्कद्वारे उपलब्ध असेल. या वेईकलची सुरुवातीची किंमत २८.७० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
अतिरिक्त माहितीसाठी खालील अटॅचमेंट पाहावी.


