● फ्लिपकार्ट प्लस सदस्यचे ₹२९९/- किंवा त्याहून अधिक किमतीच्या चार पात्र ऑर्डर्स पूर्ण करून दरमहा एक नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन मिळवू शकतात.
● ही भागीदारी फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट ग्रोसरी आणि फ्लिपकार्ट मिनिट्सवरील दैनंदिन खरेदीवर बक्षीस देईल.
● नियमित खरेदीला नेटफ्लिक्सच्या जागतिक दर्जाच्या मनोरंजनाच्या प्रवेशात रूपांतरित करून लॉयल्टीसाठी एक नवीन दृष्टिकोन सादर करते.
● संपूर्ण भारतातील लाखो ग्राहकांसाठी अधिक दैनंदिन मूल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले.
बंगळुरू, ३१ जुलै २०२६: फ्लिपकार्ट आणि नेटफ्लिक्सने आज एका भागीदारीची घोषणा केली असून त्यामुळे फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना स्वतंत्र सबस्क्रिप्शन किंवा बंडल रिचार्जशिवाय त्यांच्या नियमित खरेदीमधून दरमहा एक नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन मिळवता येईल. ही भागीदारी ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाचा आधीपासूनच भाग असलेले दोन अनुभव एका सोप्या आणि फायदेशीर मार्गाने एकत्र आणते. जगातील अग्रगण्य मनोरंजन सेवा असलेली नेटफ्लिक्सची सुविधा स्वतंत्रपणे खरेदी करण्याऐवजी किंवा दुसऱ्या सेवेसोबत बंडल करण्याऐवजी दैनंदिन खरेदीमधून मिळवता येण्याची भारतीय ई-कॉमर्समध्ये ही पहिलीच वेळ आहे. हा लाभ १ ऑगस्ट, २०२६ पासून लागू होईल.
हे कसे काम करते:
याची कार्यपद्धती सोपी आहे:
• फ्लिपकार्ट प्लस सदस्यांनी एका कॅलेंडर महिन्यात ₹२९९/- किंवा त्याहून अधिक किमतीच्या चार पात्र ऑर्डर्स मागवणे आवश्यक आहे.
• पात्र ऑर्डर्स फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि फ्लिपकार्ट ग्रोसरी यांवर देता येतात.
• चौथी पात्र ऑर्डर पूर्ण झाल्यावर पुढील ३० दिवसांसाठी नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन अनलॉक होतो. त्यामुळे सदस्यांना एक महिन्यासाठी नेटफ्लिक्स पाहता येते. त्यात भारतीय आणि जागतिक चित्रपट आणि मालिकांचा संपूर्ण संच समाविष्ट आहे.
• हा लाभ थेट फ्लिपकार्ट ॲपद्वारे सक्रिय होतो — वेगळे लॉगिन नाही, अतिरिक्त पेमेंट नाही.
• पात्र ठरल्यापासून ३० दिवसांनंतर हा लाभ रीसेट होतो आणि त्याच प्रकारच्या खरेदीद्वारे तो पुन्हा मिळवावा लागतो.
• अद्याप फ्लिपकार्ट प्लस सदस्य नसलेल्या ग्राहकांना १२ महिन्यांत १५ ऑर्डर्स पूर्ण केल्यानंतर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आपोआप सदस्य बनता येईल.
जिथे खरेदी आणि मनोरंजन एकत्र येते
या भागीदारी खास ठरवणारी गोष्ट म्हणजे तिचे मॉडेल. यात नेटफ्लिक्सचा लाभ विकत घेतला जात नाही किंवा तो आधीपासूनच समाविष्ट नाही. तो खरेदीच्या सवयीतून मिळवला जातो. याचा अर्थ असा की, ग्राहक फ्लिपकार्टच्या यंत्रणेशी— दैनंदिन गरजेच्या वस्तू, किराणा सामान आणि फ्लिपकार्ट मिनिट्सद्वारे क्विक कॉमर्स यांसारख्या माध्यमांतून — जितका जास्त जोडला जाईल, तितक्या अधिक सातत्याने त्याला नेटफ्लिक्सच्या भारतीय आणि जागतिक मनोरंजन लायब्ररीत प्रवेश मिळू शकेल. खरेदी आणि मनोरंजन या दोन गोष्टी ज्या बहुतांश भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. त्या आता अभूतपूर्व पद्धतीने एकत्र येतील.
ग्राहकांसाठी संधी
ही भागीदारी भारतातील तरुण डिजिटल ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांचेही प्रतिबिंब आहे. विशेषतः ‘जेन झी’साठी, खरेदी आणि मनोरंजन हे दैनंदिन जीवनाचे एकमेकांशी घट्ट जोडलेले भाग आहेत. ही डिजिटल पिढी असल्याने ते मूल्यासोबतच अधिकाधिक अनुभवांच्या शोधात असतात. त्यामुळे केवळ व्यवहारात्मक बक्षिसांपलीकडे जाणारे लॉयल्टी प्रोग्राम्स पूर्वीपेक्षा अधिक समर्पक ठरतात. खरेदी आणि मनोरंजन एकत्र आणून फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन खरेदीतून अधिक मिळवण्याचा आणखी एक अर्थपूर्ण मार्ग उपलब्ध करून देते.
ही भागीदारी संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी सुलभ व्हावी या हेतूने तयार करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट ग्रोसरी आणि फ्लिपकार्ट मिनिट्सवर किराणा सामान, दैनंदिन गरजेच्या वस्तू किंवा इतर दैनंदिन गरजांची खरेदी करताना ग्राहक त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या खरेदीच्या सवयींद्वारे जगभरातील नेटफ्लिक्सचे लोकप्रिय चित्रपट आणि मालिका पाहू शकतात. अतिरिक्त खर्चाऐवजी दैनंदिन खरेदीवर बक्षीस देऊन हा उपक्रम फ्लिपकार्ट प्लसचे मूल्य महानगरांमधील तसेच टियर २ आणि टियर ३ शहरांमधील ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.
फ्लिपकार्टचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि धोरणात्मक भागीदारीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवी अय्यर म्हणाले, “किराणा, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि क्विक कॉमर्स हे ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग बनत असल्यामुळे आम्हाला या दैनंदिन व्यवहारांना अधिक फायदेशीर बनवण्याची एक मोठी संधी दिसत आहे. महिन्याला चार ऑर्डर्स पूर्ण करणे ही आमच्या अनेक ग्राहकांसाठी आधीपासूनच एक नैसर्गिक खरेदीची पद्धत आहे आणि ही भागीदारी त्या दैनंदिन सवयीला जागतिक दर्जाच्या मनोरंजनाच्या उपलब्धतेमध्ये रूपांतरित करते. ग्राहकांची निष्ठा आता अशा अनुभवांकडे वळत आहे ज्यांना ते खरोखरच महत्त्व देतात आणि नेटफ्लिक्ससोबत भागीदारी करणे हा नेमका तोच अनुभव देण्याचा आमचा मार्ग आहे. फ्लिपकार्ट प्लसच्या विकासातील हे आणखी एक पाऊल आहे, कारण आम्ही असा कार्यक्रम तयार करत आहोत जो आमच्या ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या अधिक पैलूंमध्ये खरे मूल्य देईल.”
नेटफ्लिक्सचे उपाध्यक्ष (एपीएसी भागीदारी – व्यवसाय विकास) लॉरेंट युगेन म्हणाले की, “भारत ही जगातील सर्वात रोमांचक मनोरंजन बाजारपेठांपैकी एक आहे आणि सर्वात मजबूत भागीदारी ग्राहकांच्या खऱ्या सवयींवर आधारित असते. फ्लिपकार्ट लाखो भारतीयांसाठी रोजच्या खरेदीचा एक भाग आहे आणि आम्ही एकत्रितपणे फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना त्यांच्या मासिक खरेदीच्या टप्प्यांनुसार एका महिन्याचे नेटफ्लिक्स मोबाईल मिळवण्याचा एक सोपा आणि फायदेशीर मार्ग देत आहोत. ही नेटफ्लिक्सची भारतातील पहिली ई-कॉमर्स भागीदारी आहे. आम्ही ज्या प्रकारची प्रभावी, ग्राहककेंद्री भागीदारी निर्माण करू इच्छितो, त्याचे हे द्योतक आहे. ही भागीदारी सोपी, फायदेशीर आणि फ्लिपकार्ट प्लस सदस्य आधीपासूनच ज्या पद्धतीने खरेदी करतात व व्यवहार करतात, त्यावर आधारित आहे.”
फ्लिपकार्ट ग्रुपबाबत
फ्लिपकार्ट ग्रुप हा भारतातील एक अग्रगण्य डिजिटल वाणिज्य समूह असून त्याचा पाया तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि तो मजबूत आहे. यात फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, क्लिअरट्रिप आणि सुपर.मनी या समूह कंपन्यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टची स्थापना २००७ मध्ये झाली असून लाखो विक्रेते, व्यापारी आणि लहान व्यवसायांना भारतातील डिजिटल कॉमर्स क्रांतीत सहभागी होण्यास सक्षम केले आहे. फ्लिपकार्ट मार्केटप्लेस ५० कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्त्यांसह ८० हून अधिक श्रेणींमध्ये १५ कोटींहून अधिक उत्पादने उपलब्ध करते. आज या प्लॅटफॉर्मवर शॉप्सी विक्रेत्यांसह १४ लाखांहून अधिक विक्रेते आहेत. तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेद्वारे मूल्य देताना प्रत्येक भारतीयाला सक्षम आणि आनंदी करण्यावर लक्ष केंद्रित करून, फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी, नो कॉस्ट ईएमआय, इझी रिटर्न्स आणि यूपीआय पेमेंट्स अशा सेवा सुरू केल्या आहेत. खरेदीच्या पलीकडे जाऊन फ्लिपकार्ट रोजगार निर्मिती, उद्योजकांना सक्षमीकरण आणि भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांसाठी, कृपया येथे लिहा: media@flipkart.com
नेटफ्लिक्सबाबत:
नेटफ्लिक्स ही जगातील अग्रगण्य मनोरंजन सेवांपैकी एक असून ती विविध प्रकारच्या शैली आणि भाषांमध्ये मालिका, चित्रपट, गेम्स आणि थेट कार्यक्रम सादर करते. सदस्य हवे तितक्या वेळा, कधीही, कुठेही पाहणे सुरू करू शकतात, थांबवू शकतात आणि पुन्हा सुरू करू शकतात, तसेच ते कधीही त्यांचे प्लॅनही बदलू शकतात.


