Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १६ ऑगस्टला अण्णा भाऊ साठे विचारवेध साहित्य संमेलन'*

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १६ ऑगस्टला अण्णा भाऊ साठे विचारवेध साहित्य संमेलन’*

 

 

पुणे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारवेध साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता विद्यापीठ परिसरात संपन्न होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

पद्मपाणी फाऊंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील पुरोगामी विचार आणि सामाजिक संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.

या संमेलनाबाबत पद्मपाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष व निमंत्रक राहुल डंबाळे, सहसंयोजक सतिष वाघमारे, कर्मचारी संघाचे संतोष मदने, तसेच संयोजन समितीचे प्रा. वैशाली देठे, सुवर्णा डंबाळे, डॉ. राहुल ससाणे आणि अक्षय कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या संमेलनात विविध वैचारिक सत्रांचे आणि साहित्यिक चर्चांचे आयोजन केले जाणार असून, नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments