Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीओईपीमधील वसतिगृहाची क्षमता वाढविण्याचा आराखडा सादर करा* *नदी...

सीओईपीमधील वसतिगृहाची क्षमता वाढविण्याचा आराखडा सादर करा* *नदी सुधार प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करा – ना. चंद्रकांतदादा पाटील*

 

 

पुणे : सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

ना. पाटील यांनी आज सीओईपीमधील मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहांची तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोट क्लब परिसराची पाहणी करून संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

 

यावेळी सीओईपीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, सीओईपी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष विनायक पै, कुलसचिव डी. एन. सोनावणे, अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. पराग सदगिर, विद्यार्थी संघटनेचे माजी सदस्य जगदीश कदम, डॉ. राजेंद्र हिरेमठ, भरत गिते,

विवेक पवार; तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उपअभियंता उमेश शिद्रुक आदी उपस्थित होते.

 

पाहणीदरम्यान कुलगुरू डॉ. भिरुड यांनी मुलींच्या वसतिगृहाची विद्यमान क्षमता ९००, तर मुलांच्या वसतिगृहाची क्षमता १,२०० असल्याची माहिती दिली. स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने भविष्यातील गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आराखडा व अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी दिले.

 

यानंतर त्यांनी सीओईपीमधील बोट क्लब परिसराची पाहणी करून नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या नवव्या टप्प्यातील जमीन अधिग्रहणासंदर्भातील तांत्रिक अडचणींमुळे काम स्थगित असल्याची माहिती दिली. त्यावर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून संबंधित अडचणी दूर करण्यात येतील, असे सांगत प्रकल्पाचे काम कोणताही विलंब न लावता तातडीने सुरू करण्याचे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments