~भारताच्या VDA परिसंस्थेमध्ये अधिक माहितीपूर्ण सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या आपल्या प्रकारातील पहिल्या उपक्रमात संरचित शिक्षण, सिम्युलेशन आणि प्रमाणपत्र यांचा संगम करण्यात आला आहे.~
~क्रिप्ट्युशन’ (CrypTution) चा पायाभूत ‘पढो’ (Padho) अभ्यासक्रम ‘अमेरिकन ॲकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट’ (AAFM®️ India) यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आला आहे. ~
भारत, २३ जुलै २०२६: FIU-IND मध्ये नोंदणीकृत व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट (VDA) ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बिटडेल्टा इंडिया ने आज ‘क्रिप्ट्युशन’ (CrypTution) या भारतातील पहिल्या संस्थात्मक दर्जाच्या क्रिप्टो अॅसेट्स (VDA) शिक्षण आणि प्रमाणपत्र परिसंस्थेच्या लाँचची घोषणा केली.
‘क्रिप्ट्युशन’ (CrypTution) ची निर्मिती भारताच्या VDA परिसंस्थेच्या विकासाला माहितीपूर्ण आणि सक्षम सहभागाद्वारे पाठबळ देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. क्रिप्टो अॅसेट्स आणि त्यांच्याशी संबंधित माहितीची उपलब्धता वाढली असली, तरी औपचारिक शिक्षण त्या वेगाने विकसित झालेले नाही. परिणामी, अनेक सहभागी विखुरलेल्या माहितीच्या स्रोतांच्या आधारे या गुंतागुंतीच्या आणि सतत विकसित होत असलेल्या बाजारपेठेत मार्गक्रमण करत आहेत.
या उपक्रमाचा उद्देश मार्गदर्शित शिक्षण, सिम्युलेटेड बाजारपेठेचा अनुभव आणि कौशल्याधारित प्रमाणपत्र यांचा समन्वय साधून, सहभागी प्रत्यक्ष बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यमान ज्ञानातील ही तफावत भरून काढणे हा आहे. भारतातील क्रिप्टो वापरकर्त्यांपैकी जवळपास 40% वापरकर्ते टियर-2 आणि टियर-3 शहरांमधून असल्याने, हा उपक्रम विविध भौगोलिक क्षेत्रे, भाषा आणि सहभागींच्या विविध गटांसाठी संरचित VDA शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
लाँचप्रसंगी बिटडेल्टा इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) विकास एम. सचदेवा म्हणाले, “भारतातील प्रमुख आर्थिक मालमत्ता वर्गांनी जवळपास सारखाच प्रवास केला आहे—सुरुवातीच्या मर्यादित उपलब्धतेपासून आणि विखुरलेल्या समजुतीपासून ते अधिक सक्षम गुंतवणूकदार शिक्षणाच्या पाठबळावर व्यापक सहभागापर्यंत. गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढत गेल्याने म्युच्युअल फंड आणि थेट इक्विटी बाजार अधिक परिपक्व झाले आणि आता क्रिप्टोही अशाच महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचत आहे. व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्स (VDA) बाबतची जागरूकता अजूनही 30% पेक्षा कमी आहे, तर जवळपास प्रत्येक पाचपैकी एक सक्रिय सहभागी अजूनही या बाजारपेठेबद्दल शिकत आणि समजून घेत असल्याचे मान्य करतो. या श्रेणीच्या पुढील टप्प्यात जबाबदार विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले संरचित शिक्षण, व्यावहारिक अनुभव आणि प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘क्रिप्ट्युशन’ विकसित करण्यात आले आहे.”
पढो. सीखो. बढो.’ या तत्त्वांवर आधारित ‘क्रिप्ट्युशन’ (CrypTution) प्रगत आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाणाऱ्या शिक्षण प्रवासाचे अनुसरण करते.
• Padho (पढो / अभ्यास करा): ब्लॉकचेन, व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्स (VDA), बाजारपेठेची मूलतत्त्वे, सुरक्षा आणि जोखीमविषयक जागरूकता यांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक अभ्यासक्रमाद्वारे शैक्षणिक पाया तयार करते.
• Seekho (सीखो / शिका): प्रत्यक्ष भांडवल गुंतविल्याशिवाय सिम्युलेटेड बाजारपेठेच्या वातावरणात या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची संधी शिकणाऱ्यांना उपलब्ध करून देते.
• Badho (बढो / पुढे चला): आवश्यक तयारी आणि पात्रता सिद्ध करणाऱ्या सहभागींचे बिटडेल्टा इंडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्यक्ष बाजारपेठेतील सहभागाकडे प्रगत होण्यासाठी मार्गदर्शन आणि पाठबळ करते.
शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग ‘अमेरिकन ॲकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इंडिया’ (AAFM®️ India) यांच्या भागीदारीतून राबविला जातो; ही संस्था ‘पढो’ (Padho) या उपक्रमासाठी ज्ञान आणि शिक्षण पुरवणारी भागीदार आहे. BFSI (बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा) क्षेत्रातील शिक्षणाचा ३० वर्षांहून अधिक अनुभव आणि १,००,००० हून अधिक वित्त व्यावसायिकांना प्रशिक्षित केल्याचा वारसा असलेल्या AAFM India मुळे, BitDelta India सोबतच्या या सहयोगात जागतिक दर्जाची शैक्षणिक मानके उपलब्ध होतात. यामुळे शिकणाऱ्यांना सर्वसमावेशक अभ्यासक्रम, क्षमता-आधारित मूल्यमापन आणि विशेष प्रमाणपत्र मिळवण्याचे मार्ग उपलब्ध होतात.
‘अमेरिकन ॲकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इंडिया’ (AAFM®️ India) चे कार्यकारी संचालक रोमित बरात म्हणाले, “विश्वासार्ह वित्तीय शिक्षण हे संरचित, मोजता येण्याजोगे आणि मान्यताप्राप्त मानकांवर आधारित असणे आवश्यक आहे. बिटडेल्टा इंडिया सोबतच्या आमच्या सहकार्याद्वारे, क्रिप्ट्युशन (CrypTution) मध्ये AAFM India च्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त शैक्षणिक मानकांमागील शिस्तबद्धता, निश्चित अभ्यासक्रम, पारदर्शक मूल्यमापन प्रक्रिया आणि विशेष प्रमाणपत्र मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शिकणाऱ्यांना सिद्ध करता येईल अशी कौशल्ये विकसित करण्यास आणि विकसित होत असलेल्या VDA परिसंस्थेत जबाबदारीने सहभागी होण्यास मदत होईल.”
विविध प्रकारच्या शिकणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, CrypTution तीन विशेष शिक्षण मार्ग (learning paths) उपलब्ध करून देते: सर्टिफाइड व्हर्च्युअल ॲसेट इन्व्हेस्टर (Certified Virtual Asset Investor): गुंतवणुकीचे मूलभूत ज्ञान मिळवून देण्यासाठी तयार केलेला मार्ग. सर्टिफाइड व्हर्च्युअल ॲसेट प्रॅक्टिशनर (Certified Virtual Asset Practitioner): सल्लागारांना या ॲसेट क्लासबद्दल (मालमत्ता प्रकाराबद्दल) सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि सखोल ज्ञान देऊन सक्षम करण्यासाठी तयार केलेला मार्ग. सर्टिफाइड व्हर्च्युअल ॲसेट ट्रेडर (Certified Virtual Asset Trader): प्रगत ट्रेडिंग, बाजार विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन (risk management) यासाठी तयार केलेला मार्ग.
प्रमाणपत्राच्या पलीकडे, क्रिप्ट्युशन (CrypTution) एकाच परिसंस्थेमध्ये मार्गदर्शित शिक्षण, व्यावहारिक सिम्युलेशन, बाजारपेठेतील माहिती, मूल्यमापन, वेबिनार, मार्गदर्शन (मेंटॉरशिप) आणि समुदाय सहभाग यांचा समावेश करते. या एकात्मिक दृष्टिकोनाद्वारे, बिटडेल्टा इंडिया भारतातील अधिक माहितीपूर्ण, सक्षम आणि जबाबदार VDA परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवते.


