Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedथोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन.... 

थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन…. 

 

 

 

 

पिंपरी, दि. ३ ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक, ‘प्रती सरकार’चे शिल्पकार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

 

 

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे,उप आयुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

 

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. ब्रिटिश सत्तेविरोधात निर्भयपणे उभे राहत त्यांनी जनतेच्या सहभागातून ‘प्रती सरकार’ची स्थापना करून स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजघटकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी अध्याय म्हणून ओळखला जातो.

 

 

 

राष्ट्रप्रेम, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि जनकल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य देत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आयुष्यभर समाजहितासाठी कार्य केले. त्याग, संघर्ष आणि निःस्वार्थ समाजसेवेचा त्यांचा आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांतून राष्ट्रसेवा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

 

 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान क्रांतिकारकाचे कार्य, विचार आणि राष्ट्रसेवेचा वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजहित, लोककल्याण आणि राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याचा सं

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments