Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हास्तरीय 'नशामुक्त भारत अभियान' स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद;  २० महाविद्यालयांतील २५० हून...

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत अभियान’ स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद;  २० महाविद्यालयांतील २५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

 

 

मुंबई, दि. ३ : माय भारत, मुंबई आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या एम. एल. दहानुकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), विलेपार्ले (पूर्व) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे, तसेच पीटीव्हीए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत अभियान’ स्पर्धांचे आयोजन शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष सीए अनिल गानू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी पीटीव्हीएचे मानद सचिव दिलीप पेठे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले, पीटीव्हीए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. तेजश्री देशमुख, विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक चैत्राली साबळे तसेच एम. एल. दहानुकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त)चे प्राचार्य प्रा. डॉ. विनय भोळे उपस्थित होते.

यावेळी अनुप इंगोले यांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ स्पर्धांची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. प्राचार्य प्रा. डॉ. विनय भोळे यांनी युवकांमध्ये व्यसनमुक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तर पोलीस निरीक्षक चैत्राली साबळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. समूह नृत्य, पथनाट्य, चित्रकला, घोषवाक्य लेखन, रील मेकिंग, संगीत, कविता आणि वक्तृत्व अशा विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व स्पर्धांचा विषय ‘नशामुक्त भारत अभियान’ हा होता. प्रत्येक स्पर्धेसाठी तीन अनुभवी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून निकालासह मार्गदर्शक अभिप्राय दिला.

या स्पर्धांमध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वैयक्तिक स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्रे, तर सांघिक स्पर्धांतील विजेत्या संघांना क्रीडा साहित्य संच आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम. एल. दहानुकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त)चे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी शुद्धोधन आठवले, श्रुती सावे आणि कल्पेश वरणकर, पीटीव्हीए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे जिगर पटेल, तसेच माय भारत, मुंबईचे अनुप इंगोले यांनी ५० समर्पित राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले

.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments