पुणे, ४ आँगस्ट २०२६ – सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने एक नवी योजना सादर केली आहे. सँमसंगने ३०-महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्याय सादर केला आहे. त्यामुळे मासिक मालकीचा अडथळा कमी करण्यासाठी डिझाइन केलेले नवीन फायनान्सिंग पर्याय अधिकाधिक ग्राहकांना शून्य डाऊन पेमेंटसह गॅलेक्सी एआयद्वारे समर्थित सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजचा अनुभव घेण्याची सुविधा देतो.
ग्राहक आता गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा प्रति महिना फक्त ६६६७ रुपये यापासून सुरू होणार्या ईएमआयसह खरेदी करू शकतात. हा ईएमआय आधीच्या जनरेशनमधील गॅलेक्सी झेड फोल्ड७ पेक्षा ९ टक्के कमी आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड८ प्रति महिना ६००० रुपयांपासून सुरू होणार्या ईएमआयसह उपलब्ध आहे, तर गॅलेक्सी झेड फ्लिप८ प्रति महिना फक्त ४१६७ रुपयांपासून सुरू होणार्या ईएमआयसह उपलब्ध आहे. ज्यामुळे अत्याधुनिक फोल्डेबल तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांना परवडणारे होत आहे.
३०-महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय प्रपोजल सॅमसंग फायनान्स+ (डीएमआय फायनान्सद्वारे समर्थित), टीव्हीएस क्रेडिट, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पूनावाला फिनकॉर्पद्वारे उपलब्ध आहे, जे ग्राहकांना सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल नाविन्यतांची मालकी मिळवण्यासाठी अधिक स्थिरता प्रदान करते.
३०-महिन्यांचा परतफेडीचा कालावधी ग्राहकांना मालकीचा खर्च दीर्घ कालावधीत विस्तारित करण्यास सक्षम करतो, ज्यामुळे गॅलेक्सी एआय नाविन्यता, प्रीमियम डिझाइन आणि प्रमुख कार्यक्षमतेचा आनंद घेत प्रीमियम फोल्डेबल तंत्रज्ञानाची मालकी मिळवणे सो
पे होते.


