Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिशलिन प्रिमसी ५ टायर आता भारतात उपलब्ध होणार कंपनीकडून भारतीय ग्राहकांसाठी स्वदेशी...

मिशलिन प्रिमसी ५ टायर आता भारतात उपलब्ध होणार कंपनीकडून भारतीय ग्राहकांसाठी स्वदेशी बनावटीची पहिले कार टायर बाजारात दाखल झाले आहे.

नवीन आणि जुन्या अशा दोन्ही टायरमध्ये आघाडीच्या स्पर्धक टायरनिर्मिती कंपन्यांच्या तुलनेत ओल्या रस्त्यावर वाहन चालवताना सुरक्षितता मिळते. या टायरमुळे ओल्या रस्त्यावर ब्रेक लावण्याचे अंतर ८ मीटरहूनही कमी राहते. त्यामुळे चालकाला प्रवासादरम्यान इतर टायर्सच्या तुलनेत सुरक्षित असल्याचा अनुभव मिळतो.
इतर टायर्सच्या तुलनेत मिशलिन प्रिमसी ५ टायरच्या वापराने विनाअडथळा ९ टक्के जास्त आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो.
अगोदरच्या मॉडेल्सच्या तुलनेत ८ टक्के जास्त काळ कार्यरत राहणारा टिकाऊ टायर म्हणून हे उत्पादन उपयुक्त ठरते.
टायर तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी मिशलिनने आज भारतात मिशलिन प्रिमसी हे नवीन उत्कृष्ट दर्ज्याचे टायर बाजारात दाखल केले आहे. हे टायर सेडान आणि एसयूव्ही या प्रवासी वाहनांसाठी विकसित करण्यात आले आहे. देशात कंपनीचा विस्तार व्हावा, याकरिता हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तसेच, मिशलिन प्रिमसी ५ हा भारतातच उत्पादित करण्यात आलेला मिशलिनचा पहिला प्रवासी कार टायर आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना आता देशांतर्गत तयार झालेला आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या मिशलिन टायर उपलब्ध होणार आहे.
वाहतूकीशी निगडीत दैनंदिन समस्या ध्यानात घेत मिशलिन प्रिमसी ५ टायरची निर्मिती करण्यात आली आहे. यात मिशलिनच्या अत्याधुनिक ट्रेड पॅटर्न तंत्रज्ञानासह नव्या पिढीतील रबर कंपाऊंडचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा टायर सुरक्षितपणे वापरता येतो. तसेच वाहन चालविताना प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येतो. वाहनावरही नियंत्रण राखता येते. शिवाय ऊर्जेचाही कार्यक्षम वापर करता येतो. हा टायर पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांनासाठी उपयुक्त आहे.
नुकताच चेन्नई येथे मिशलिन प्रिमसी ५ चा अनावरण सोहळा पार पडला. या शभारंभाप्रसंगी मिशलिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शांतनू देशपांडे यांनी सांगितले की, “भारतातील प्रीमियम वाहनांचे क्षेत्र वेगाने बदलत आहे. आता सेदान, एसयूव्ही आणि ई-वाहनांसाठी सुरक्षित, टिकाऊ आणि उच्च दर्ज्याच्या टायर्सची मागणी वाढत आहे. भारतातच मिशलिन प्रिमसी ५ ची निर्मिती करण्यात आली आहे. आमच्यासाठी या टायरचे अनावरण हा एक खास टप्पा आहे. आम्ही भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, हेच यावरून दिसून येते. प्रिमसी ५ हा टायस खासकरून भारतीय चालकांसाठी तयार करण्यात आला आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणा-या वाहनांवर या टायर्सची चाचणी करण्यात आली. तसेच, या टायरची आघाडीच्या स्पर्धकांच्या उत्पादनांशी तुलना करण्यात आली असून, स्वतंत्र संस्थेमार्फत गुणवत्ता चाचणीही तपासण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे तंत्रज्ञान, स्थानिक उत्पादनाची जोड दिल्याने हा टायर सुरक्षितता, दीर्घायुष्य, आरामदायी प्रवास आणि इंधन बचतीसाठी उत्तम पर्याय ठरेल.
भारत ही मिशलिन समूहासाटी महत्त्वाची वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहे. कंपनी देशभरात आपले जाळे मजबूत करत आहे. उत्पादन आणि सेवा सुविधा वाढवण्यावर भर देत आहे. कंपनी अधिकाधिक भारतीय ग्राहकांना वाहनांशी संबंधित आंतरराष्ट्रीय उपाययोजना उपलब्ध करुन देण्यास कटिबद्ध आहे. मिशलिन भारतातील उत्पादन क्षेत्राला बळकट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीतही योगदान देत राहील ”
सुरक्षितता आणि दीर्घायुष्य:
मिशलिन कंपनी ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते. नवीन मिशलिन प्रिमसी ५ टायर हा वाहनचालकांना प्रवासादरम्यान सुरक्षित ठेवतो. हा टायर इतर वर्गवारीतील टायर्सच्या तुलनेत ओल्या रस्त्यांवर संयमीपद्धतीने ब्रेक घेतो. टायर नवीन असल्यास वाहन थांबवण्याचे अंतर स्पर्धक टायरच्या तुलनेत ८ मीटरपर्यंत कमी राहते. टायर झिजल्यानंतरही हे अंतर ९ मीटरपर्यंतच दिसून येते. कोरड्या रस्त्यावरही ब्रेकिंगची कामगिरी चांगली आहे. कोरड्या रस्त्यावर ब्रेकिंगची कामगिरी यापेक्षाही चांगली आहे. या टायरमुळे कोरड्या रस्त्यावरील वाहन थांबवण्याचे अंतर ४ मीटरने कमी होते. त्यामुळे वाहन चालवताना ग्राहक सुरक्षित राहतो. यात एव्हर ट्रेड आणि एव्हर ग्रिप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या किंवा झिजलेल्या या दोन्ही स्वरुपातील टायरची रस्त्यावरची पकड कायम राहते. या टायरमुळे ग्राहकाला वाहन चालवताना रस्त्यावरची पकड मजबूत असल्याचा अनुभव मिळतो.
आरामदायी अनुभव:
मिशलिन प्रिमसी ५ हा टायर आरामदायी प्रवासाकरिता विकसित करण्यात आला आहे. या श्रेणीतील इतर टायरच्या तुलनेत मिशलिन प्रिमसी ५च्या वापरामुळे प्रवासादरम्यान ९ टक्क्यांनी जास्त आराम मिळतो. या टायरमध्ये आवाज कमी करणा-या नव्या ट्रेड पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे टायरमधून निर्माण होणारा आवाज कमी होतो. वाहन चालविताना शांततामय आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येतो. टायर मजबूत असल्याने प्रवासादरम्यान चालकाला कोणताही बाधा पोहोचत नाही.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी उपयुक्त:
नवीन मिशलिन प्रिमसी ५ हा टायर इलेक्ट्रिक आणि इंधनावर धावणा-या अशा दोन्ही वाहनांसाठी उपयुक्त ठरतो. देशातील वाहन बाजारपेठेतील बदलत्या गरजा लक्षात घेत या टायरची निर्मिती करण्यात आली आहे. या टायरमध्ये आधुनिक जड वाहने आणि अतिरिक्त टॉर्क हाताळण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा टायर प्रवासादरम्यान टिकाऊ असल्याचा अनुभव मिळतो शिवाय प्रवासातही सातत्यता मिळते. टायरमधून होणारा आवाजही कमी होतो. मिशलिन प्रिमसी ४एसटी च्या तुलनेत या टायरची ऊर्जा कार्यक्षमता ६.५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये इंधनाचा वापर कमी होण्यास मदत होते. तसेच, एका चार्जिंगनंतर इलेक्ट्रिक वाहनांची धावण्याची क्षमता सक्षम होते.

मिशलिन प्रिमसी ५ ला टायरला ‘टायर ऑफ द इयर २०२५’ या पुरस्कराने गौरविण्यात आले आहे. ‘टायर टेक्नोलॉजी इंटरनॅशनल अवॉर्ड्स फॉर इनोव्हेशन एण्ड एक्सलन्स २०२५’ या पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. मिशलीन प्रिमसी ५ टायरमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
ऑगस्ट २०२६ पासून देशभरातील मिशलिन टायर्स एण्ड सर्विसेस केंद्रांमध्ये मिशलिन प्रिमसी ५ विक्रीसाठी उपलब्ध असेल. हे टायर मिशलिनच्या ८०० अधिकृत विक्रेत्यांकडूनही खरेदी करता येईल. या सोयींमुळे ग्राहकांना टायरची खरेदी करणे सोपे होईल. तसेच, मिशलनिच्या अधिकृत सेवा सुविधांचाही लाभ घेता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments