Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized. विश्वनाथ दा. कराड, संस्थापक-अध्यक्ष, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत ...

. विश्वनाथ दा. कराड, संस्थापक-अध्यक्ष, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया

एक ज्येष्ठ व द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनाची बातमी मनाला अत्यंत चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण भारतातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील एका बहुआयामी, दूरदर्शी, संवेदनशील आणि दीपस्तंभासारख्या व्यक्तिमत्त्वाचा एक अध्याय काळाच्या पडद्याआड झाला असं वाटतं.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने एमआयटी संस्थेचा एक हितचिंतक व मोठ्या भावासमान असणार्‍या मार्गदर्शक लोप पावला आहे. अशा या क्लेशदायी प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.गेली तीन-चार दशके माझे आणि डी. वाय. पाटील यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. एक द्रष्टा, संवेदनशील व बंधुतुल्य स्नेही म्हणून मी त्यांच्याकडे बघितले.

आमच्या संस्थेचे ते एक आधारस्तंभच होते. डॉ. डी. वाय. पाटील यांनी त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून बहुजन समाजातील हजारो-लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले, हे त्यांचे महाराष्ट्रावरील न फिटणारे ऋण आहे.
दादा, अर्थात डॉ. पाटील, हे अनेक संकटांमध्ये एमआयटीच्या संस्थेमागे अत्यंत निर्धाराने उभे राहिले, आम्हाला प्रोत्साहन दिले, मग ते इंद्रायणी नदीवरील घाट बांधणे असो वा तीर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थक्षेत्रात परावर्तित करण्याचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम असो, दादांनी मोठ्या भावाच्या हक्काने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
माझ्या प्रत्येक वाढदिवसाला दादांचा येणारा शुभेच्छांचा फोन आता येणार नाही, या विचाराने मन गहिवरते आणि अतिशय व्यथित मनाने मी माझे ज्येष्ठ बंधुतुल्य मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने शिक्षणयोगी असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments