Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश*

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश*

पुणे, दि. ४ ऑगस्ट : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणसम्राट पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. डी. वाय. पाटील हे प्रामाणिक, अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेचे आणि लोकाभिमुख नेतृत्व लाभलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. राजकारण, शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला. महाराष्ट्रासह देशभरात अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली केली. शिक्षणाचा व्यापक विस्तार घडवून आणण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.

राजकीय जीवनात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारीने सेवा बजावली. शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असे प्रतिभाताई पाटील यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या दीर्घ सहवासाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, त्यांची साधेपणा, माणुसकी आणि कार्यनिष्ठा नेहमीच प्रेरणादायी होती. त्यांच्या निधनाने देशाने एक दूरदृष्टी असलेला शिक्षणप्रेमी, अनुभवी राजकारणी आणि समाजसेवक गमावला असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. शेवटी, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, अशी प्रार्थना प्रतिभाताई पाटील यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments