Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedलाखात एक: कोटक कन्या स्कॉलरशीप 2026 भारतातील आगामी पिढीतील यशवंत शोधण्याकरिता सज्ज

लाखात एक: कोटक कन्या स्कॉलरशीप 2026 भारतातील आगामी पिढीतील यशवंत शोधण्याकरिता सज्ज

05 ऑगस्ट, 2026: कोटक महिंद्रा समुहाची सीएसआर अंमलबजावणी शाखा असलेल्या कोटक एज्युकेशन फाऊंडेशनने (केईएफ) आज ‘वन इन अ मिलियन’ या मोहिमेच्या बॅनरखाली ‘कोटक कन्या स्कॉलरशीप 2026’ सुरू करण्याची घोषणा केली. आता सहाव्या वर्षात, हा कार्यक्रम समाजातील वंचित घटकांमधील गुणवान विद्यार्थिनींसाठी व्यावसायिक उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडत आहे. ज्यामुळे त्या करियरच्या मार्गातील आर्थिक अडथळ्यांशिवाय स्वत:च्या महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करण्यास सक्षम होतील.

2021 मध्ये स्थापना झाल्यापासून, कोटक कन्या स्कॉलरशीप’चा 24 राज्यांमधील 1,525 मुलींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम झाला आहे. 2026-27 मध्ये 500 नवीन विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात येईल. आर्थिक मदतीव्यतिरिक्त, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ) तज्ज्ञ मार्गदर्शन, मौल्यवान करियर मार्गदर्शन, उद्योग परिचय आणि शालेय सत्रे पूर्ण करणे, गंभीर विचारांचे पोषण, 21 व्या शतकातील क्षमता आणि व्यावसायिक क्षेत्रातील कामाची तयारी याद्वारे सर्वांगीण विकास सुनिश्चित करते.

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्रुप सीएसआरच्या सीनियर व्हाईस प्रेसिडंट रिधी भाटिया म्हणाल्या, “शिक्षण हे दीर्घकालीन सामुदायिक विकासाच्या सर्वात शक्तिशाली चालकांपैकी एक आहे. तथापि, अनेक पात्र तरुण स्त्रियांसाठी, आर्थिक अडचणी त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर व्यावसायिक उच्च शिक्षणाची उपलब्धता मर्यादित ठेवत आहेत. कोटक कन्या स्कॉलरशीप’च्या माध्यमातून, आम्ही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो की आर्थिक परिस्थिती नव्हे तर गुणवत्ता आणि महत्वाकांक्षा-एका तरुणीचे भविष्य घडवतात. ज्यामुळे तिला तिच्या क्षमतेचा शोध घेता येईल आणि स्वत:चे कुटुंब, समुदायासाठी आणि त्यापलीकडे कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करता येईल.”

कोटक कन्या स्कॉलरशीप प्रोग्रामच्या प्रमुख आणि कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या एक्झिक्यूटीव्ह कमिटी मेंबर (ईसी) आरती कौलगुड म्हणाल्या, “आम्ही कोटक कन्या स्कॉलरशीप’चा पहिला यशस्वी निकाल साजरा करत असताना, आमच्या प्रतिभावंतांनी एक तरंग निर्माण केल्याचे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि भारतातील आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सामील होण्यापासून ते आमचे पहिले डॉक्टर म्हणून पदवी प्राप्त करण्यापर्यंत, ते केवळ त्यांच्या स्वतःच्या आकांक्षाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांची स्वप्ने देखील पूर्ण करत आहेत. त्यांचे यश आम्हाला आणखी 500 पात्र तरुण स्त्रियांना ही संधी देण्यासाठी प्रेरित करते. आमची कठोर निवड आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणे आम्हाला सर्वात प्रभावी शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक बनवते. पारंपरिकपणे कमी प्रतिनिधित्व असलेल्या क्षेत्रांमध्ये अधिक महिलांना करिअर करण्यास सक्षम करून, आम्ही अधिक लिंग-संतुलित कार्यबल तयार करण्यास मदत करत आहोत. आम्ही भारतातील सर्वात हुशार तरुणींना अर्ज करण्यासाठी आणि परिवर्तनाची पुढची पिढी बनण्यासाठी प्रोत्साहित करतो.”

शिष्यवृत्तीची ठळक वैशिष्ट्ये:

1. ₹ 1.5 लाख* प्रति विद्यार्थी प्रति वर्ष व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम/पदवी पूर्ण होईपर्यंत
2. एनआयआरएफ मान्यताप्राप्त संस्थांमध्ये इंजिनिअरिंग, एमबीबीएस, आर्किटेक्चर, डिझाईन आणि इंटीग्रेटेड एलएलबी यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम समाविष्ट आहेत.
3. मार्गदर्शन (mentoring), जीवन कौशल्ये (life skills) आणि मानसिक कल्याण (mental well-being) सत्रांमध्ये प्रवेश
4. भारतातील 136 सर्वोच्च संस्थांमधील प्रतिभावंत

कोटक कन्या स्कॉलरशीप 2026-27 करिता पात्रता निकष:

· भारतभरातील गुणवान विद्यार्थिनींसाठी खुले

· 12वीच्या बोर्ड परीक्षेत 75% किंवा अधिक गुण (किंवा समकक्ष सीजीपीए) मिळवलेले असावेत.

· कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹6,00,000 पेक्षा कमी असावे

· एनआयआरएफ किंवा एनएएसी मान्यताप्राप्त संस्थेत इंजिनिअरिंग, एमबीबीएस, इंटिग्रेटेड एलएलबी (5 वर्षे) इंटिग्रेटेड बीएस-एमएस/बीएस-रिसर्च (आयआयएसईआर, आयआयएससी बंगळुरू) डिझाइन किंवा आर्किटेक्चर सारख्या प्रवाहात व्यावसायिक पदवी कार्यक्रमाच्या (2026-27) पहिल्या वर्षात प्रवेश मिळवलेला असावा.

· कोटक महिंद्रा ग्रुप, कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि बडी4स्टडीच्या कर्मचाऱ्यांची मुले अर्ज करण्यास पात्र नाहीत

केईएफच्या शिष्यवृत्ती शाखेने आतापर्यंत 4,000 हून अधिक यशवंतांना पाठिंबा दिला असून 2000 हून अधिक माजी विद्यार्थी आता आघाडीच्या कंपन्या आणि इतर संस्थांमध्ये व्यावसायिक म्हणून भरभराटीला आले आहेत.

*अस्वीकरणः अटी आणि नियम लागू आहेत. शिष्यवृत्तीची निवड तसेच रक्कम ही पात्रता निकषांच्या पूर्ततेवर आधारित आहे आणि कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या अधीन आहे.

कोटक एज्युकेशन फाउंडेशनविषयी

कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ) ही कोटक महिंद्रा समूहाच्या सीएसआर ओळख, कोटक कर्मा अंतर्गत शिक्षण-केंद्रित कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांसाठी प्राथमिक अंमलबजावणी संस्था आहे.

सुमारे दोन दशकांपासून, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ) उच्च दर्जाचे शिक्षण, कौशल्य विकास आणि उपजीविकेच्या संधींच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायातील बालके तसेच तरुणांचे जीवन बदलण्यासाठी काम करत आहे. सखोल, शाश्वत परिणाम निर्माण करण्याच्या त्याच्या तत्त्वज्ञानाद्वारे मार्गदर्शित, केईएफ पुरावा-आधारित हस्तक्षेपांची रचना आणि अंमलबजावणी करते जे शैक्षणिक परिसंस्था बळकट करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करण्यास सक्षम करते.

कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ)चा एकात्मिक दृष्टीकोन पायाभूत शिक्षण बळकट करणे, शालेय नेतृत्व सुधारणे आणि शिक्षकांची क्षमता वाढवणे, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश फ्युचर रेडीनेस (सीई-एफआर) कौशल्ये, एसटीईएम शिक्षण ते शिष्यवृत्तीद्वारे उच्च शिक्षणापर्यंत पोहोच वाढवणे आणि व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य कार्यक्रमांद्वारे रोजगारक्षमता वाढवण्यापासून संपूर्ण शैक्षणिक सातत्य विस्तारतो.

सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, समुदाय आणि क्षेत्रातील भागधारकांसह धोरणात्मक भागीदारीद्वारे, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ)ने स्केलेबल मॉडेल तयार केले आहेत जे शिकण्याचे परिणाम आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये मोजता येण्याजोग्या सुधारणांना चालना देत आहेत.

आज, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ) चे कार्यक्रम भारतातील अनेक राज्यांमधील हजारो शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या प्रमुख उपक्रम KSHAMATA च्या माध्यमातून पोहोचत आहेत. आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना, केईएफ शालेय स्तरावरील हस्तक्षेपांपासून जिल्हा आणि राज्य स्तरावरील परिवर्तनापर्यंत आपला दृष्टीकोन विस्तारत आहे. प्रणाली-बळकट भागीदारी, नवोन्मेष आणि प्रमाणासह प्रत्यक्ष अंमलबजावणीचे कौशल्य एकत्रित करून, केईएफ न्याय्य, भविष्यासाठी सज्ज अशी शैक्षणिक प्रणाली तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे जी लाखो मुले आणि तरुणांना भरभराटीसाठी सक्षम करते आणि भारताच्या विकास गाथेत अर्थपूर्ण योगदान देते.

शालेय शिक्षणाच्या पलीकडे, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ)ने शिष्यवृत्ती आणि रोजगारक्षमतेच्या उपक्रमांची एक सर्वसमावेशक परिसंस्था तयार केली आहे जी तरुणांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासातील निर्णायक संक्रमण टप्प्यांवर मदत करते. केईएफ’चे स्कॉलरशीप प्रोग्राम हे सुनिश्चित करण्यासाठी तयार केले गेले आहेत की आर्थिक अडथळे आकांक्षा आणि यशासाठी अडथळे बनू नयेत. कोटक कन्या शिष्यवृत्ती भारतभरातील आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीच्या गुणवान तरुणींना आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन, शैक्षणिक सहाय्य आणि सर्वांगीण विकासाच्या संधींच्या माध्यमातून व्यावसायिक उच्च शिक्षण घेण्यास सक्षम करते. कोटक ज्युनिअर स्कॉलरशीपमुळे मुंबई महानगर प्रदेशातील उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11 आणि 12 मध्ये त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत होते, तर कोटक ग्रॅज्युएट स्कॉलरशीप पदवीपूर्व शिक्षण घेण्यासाठी आणि यशस्वी कारकिर्दीची तयारी करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना मदत करते.

या प्रयत्नांना पूरक म्हणून, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ)चे व्यावसायिक शिक्षण आणि रोजगारक्षम कार्यक्रम वंचित समुदायातील तरुणांना डिजिटल साक्षरता, बोलली जाणारी इंग्रजी, जीवन कौशल्ये, कामाच्या ठिकाणची तयारी आणि व्यावसायिक क्षमता यासह उद्योग-संबंधित कौशल्यांसह सुसज्ज करतात. रोजगाराच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करून, हे कार्यक्रम तरुणांना शाश्वत उपजीविकेच्या संधी मिळविण्यासाठी आणि औपचारिक रोजगाराच्या जगात आत्मविश्वासाने मार्गक्रमण करण्यासाठी सक्षम करतात.

आज, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ) भारतातील शैक्षणिक परिवर्तनात आघाडीवर आहे. अंमलबजावणीच्या सुमारे दोन दशकांच्या अनुभवावर आणि सखोल सामुदायिक सहभागावर आधारित, ही संस्था वैयक्तिक शालेय स्तरावरील प्रेरक प्रभावापासून जिल्हे आणि राज्यांमध्ये पद्धतशीर बदल घडवून आणण्यापर्यंत विकसित होत आहे. सरकार, संस्था आणि परिसंस्थेतील भागधारकांसह धोरणात्मक भागीदारीद्वारे, केईएफ शैक्षणिक प्रणाली बळकट करणारे, शिकण्याचे परिणाम सुधारणारे, रोजगारक्षमता वाढवणारे आणि लाखो मुले आणि तरुणांसाठी संधी वाढवणारे स्केलेबल मॉडेल तयार करत आहे. नवोन्मेष, पुरावा-आधारित सराव आणि समानतेप्रती वचनबद्धता एकत्रित करून, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ) प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची, भरभराटीची आणि यशस्वी होण्याची संधी मिळेल असे भविष्य घडवण्याच्या दिशेने काम करत आहे.

कृपया अधिक महितीकरिता भेट द्या: www.kotakeducationfoundation.org

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments