पुणे, भारत – 6 ऑगस्ट 2026: कास्टिंग्ज आणि पिग आयर्न उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक तसेच भारतातील स्टील आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (BSE : 500245) ने आज आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निकाल जाहीर केले.
आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबत भाष्य करताना किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आर. व्ही. गुमास्ते म्हणाले, “या तिमाहीत मागणीचे संमिश्र संकेत असलेल्या बाजारपेठेतील आव्हानांचा यशस्वी सामना करत किर्लोस्कर फेरसने वार्षिक 4% महसूलवाढ नोंदवली असून आपल्या व्यवसायातील लवचिकता अधोरेखित केली आहे. वाहन उद्योग आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्रातील भक्कम मागणीमुळे आमच्या कास्टिंग्ज आणि स्टील व्यवसायाने अनुक्रमे 18% आणि 13% इतकी वाढ (व्हॉल्यूम ग्रोथ) नोंदवली. त्याचा आमच्या कामगिरीला भक्कम आधार मिळाला.
कोकिंग कोळशाच्या उच्च किमती आणि ट्यूब्स विभागातील नियोजित मंदावलेली वाढ यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागला असला, तरी उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करणे आणि बाजारपेठेतील आमचे स्थान विस्तारणे या आमच्या धोरणात्मक प्रयत्नांना चांगले यश मिळाले आहे. विशेषतः मूल्यवर्धित कास्टिंग्जमधील प्रगती आणि आमच्या ट्यूब्स व्यवसायात नव्या ग्राहकांची झालेली भर याने आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे.
यापुढेही हरित ऊर्जेचा अवलंब आणि कार्यात्मक उत्कृष्टतेच्या माध्यमातून कमी खर्चात उत्पादन करण्याची क्षमता मिळविण्यावर विशेष भर देत आम्ही आमच्या पाच प्रमुख धोरणात्मक प्राधान्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू ठेवू. कार्यक्षमता वाढविणारे आमचे सुरू असलेले प्रकल्प आणि क्षमता विस्तार यामुळे बाजारपेठेतील आमचे स्थान अधिक मजबूत होईल आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन शाश्वत मूल्यनिर्मिती होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.”
स्वतंत्रपणे आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा:
कोटी रु.
Q1 FY 27
Q1 FY 26
YoY
महसूल
1,771.5
1,698.1
4%
EBITDA (before exceptional items)*
215.7
216.9
-1%
EBITDA मार्जिन *
12.2%
12.8%
PBT (Before exceptional items)
134.4
127.2
6%
PAT
82.3
235.5
-65%
एकत्रित आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा
Rs. Cr
Q1 FY 27
Q1 FY 26
YoY
महसूल
1,771.5
1,698.1
4%
EBITDA (before exceptional items)*
215.7
216.8
-1%
EBITDA मार्जिन *
12.2%
12.8%
PBT (Before exceptional items)
134.4
127.2
6%
PAT
82.3
238.0
-65%
* इतर उत्पन्न आणि अपवादात्मक बाबी वगळून.
कृपया नोंद घ्यावी की, ऑलिव्हर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अॅडिक्का एनर्जी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे कंपनीमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर मागील आर्थिक वर्षातील सर्व आकडेवारीचे पुनर्निवेदन (Restatement) करण्यात आले आहे.


