Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedबर्जर पेंट्स तर्फे पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर

बर्जर पेंट्स तर्फे पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर

पुणे, ६ ऑगस्ट २०२६ : बर्जर पेंट्सच्या आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. पश्चिम आशियातील संघर्षांनंतरही महसूल आणि ऑपरेटींग नफ्यात दोन-अंकी वाढ दिसून आली. स्वतंत्र आधारावर २५ टक्‍क्‍यांहून अधिक आणि एकत्रित आधारावर २९ टक्‍क्‍यांहून अधिक वाढीसह करोत्तर नफ्यामध्ये (पीएटी) प्रबळ वाढ दिसून आली.

३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल ३,५८३.८ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ३,२००.८ कोटी रूपयांच्या तुलनेत १२.० टक्‍के वाढ झाली. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए (इतर उत्पन्न वगळून) ६०७.४ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ५२८.४ कोटी रूपयांच्या तुलनेत १५.० टक्‍के वाढ झाली. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी निव्वळ नफा ४०५.० कोटी रूपये होता, ज्यामध्‍ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ३१५.० कोटी रूपयांच्या तुलनेत २८.६ टक्‍के वाढ झाली.

३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ऑपरेशन्समधून मिळालेला महसूल ३,२२६.७ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील २,८६२.६ कोटी रूपयांच्या तुलनेत १२.७ टक्‍के वाढ झाली.३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए (इतर उत्पन्न वगळून) ५६२.२ कोटी रूपये होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४९९.५ कोटी रूपयांच्या तुलनेत १२.६ टक्‍के वाढ झाली.३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी निव्वळ नफा ३६८.७ कोटी रूपये होता, ज्यामध्‍ये गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील २९३.८ कोटी रूपयांच्या तुलनेत २५.५ टक्‍के वाढ झाली.

“मागील तिमाहीत दिसून आलेली मागणीतील टप्प्याटप्प्याने झालेली सुधारणा वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील कायम राहिली, ज्यामुळे या तिमाहीत स्वतंत्र आधारावर १२.७ टक्‍के मूल्यात्मक वाढ साध्य करणे शक्य झाले. किमतीतील वाढीमुळे मूल्यात्मक वाढ प्रमाणातील (व्हॉल्यूम) वाढीपेक्षा अधिक राहिली, ज्याचा पूर्ण फायदा पुढे मिळत राहील. या तिमाहीतील आमची कामगिरी ऑटोमोटिव्ह आणि डेकोरेटिव्ह या दोन्ही विभागांमधील प्रबळ वाढीमुळे झाली आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित वातावरणामुळे क्रूड तेल आणि क्रूडवर आधारित कच्च्या मालाच्या उपलब्धतेत आणि किमतींमध्ये अडथळे निर्माण झाले असूनही ही नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात होती. क्रूड आधारित साहित्यातील महागाईमुळे आमच्या ग्रॉस मार्जिनमध्ये काही प्रमाणात घट झाली. पण, योग्य आर्थिक नियंत्रण आणि सुधारित कार्यक्षमतेमुळे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मार्गदर्शक श्रेणीच्या थोडे पुढे राहिले आणि करोत्तर नफ्यामध्ये (पीएटी) स्वतंत्र आधारावर २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आणि एकत्रित आधारावर २९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रबळ वाढ झाली.

वॉटरप्रूफिंग, कन्स्ट्रक्शन केमिकल्स आणि वूड कोटिंग्ज या आमच्या मुख्य लक्ष केंद्रित केलेल्या विभागांनी “कलर प्लस” आणि प्रीमियम सेगमेंटमधील मेटॅलिक्स श्रेणीच्या नवीन सादरीकरणाच्या पाठिंब्याने उत्तम वाढ नोंदवणे सुरू ठेवले. नेटवर्क विस्तार आणि कमी बाजारपेठ हिस्सा असलेल्या शहरी बाजारपेठेतील वाढीमुळे सुधारणा होत राहिली आणि या गुंतवणुकीवर सातत्यपूर्ण मूल्य निर्माण झाले.

जीएसटीमधील कपात आणि कमी आर्थिक कर्ज खर्चामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्राची दमदार कामगिरी या तिमाहीतही कायम राहिली, ज्यामुळे हे क्षेत्र पुढे गेले. उर्वरित औद्योगिक विभागांनी तिमाहीच्या शेवटी लागू केलेल्या किमती वाढीचा केवळ अंशतः लाभ मिळवला, ज्यामुळे वाढीचा दर मंदावला. पण, हे लाभ दुसऱ्या तिमाहीत पूर्णपणे दिसून येतील, ज्यामुळे कंपनीच्या नफा आणि महसुलाच्या वाढीला गती मिळण्याची शक्यता आहे.

आमच्या बर्जर बेकर आणि बर्जर निप्पॉन या संयुक्त उपक्रमांनी या तिमाहीत प्रबळ वाढ नोंदवली आहे. उपकंपन्यांनी अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे.

विविध विभाग व बाजारपेठांमधील देशांतर्गत मागणीच्या निर्देशकांमध्ये झालेली टप्प्याटप्प्याची सुधारणा आणि सुरुवातीच्या अंदाजापेक्षा मान्सूनची चांगली झालेली प्रगती हे आगामी महिन्यांसाठी सकारात्मक संकेत आहेत.

परकीय चलनातील चढ-उतार आणि भू-राजकीय अनिश्चितता यांमुळे पुरवठ्यातील अडथळे आणि कच्च्या मालाची महागाई या दोन्ही स्तरांवर नजीकच्या भविष्यात मार्जिनचे धोके निर्माण होत आहेत.

बर्जर पेंट्समध्ये आमचे प्रयत्न नेटवर्क विस्तार, उत्पादन आणि सेवांमधील नाविन्यता व ब्रँड निर्मितीवर केंद्रित राहतील, ज्याचा उद्देश आमचे गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी मूल्य वाढवणे हा आहे. आमच्या उत्पादनांची आणि रंगांची स्थिरता दर्शवणारी नवीन कॉर्पोरेट जाहिरात “जैसे भी हो दिन, रंग बना रहे” या टॅग लाईनसह रिलीज करण्यात आली आहे, जी प्रत्येक भिंतीवर आमच्या उत्पादनांची कार्यात्मक टिकाऊपणा व स्थिरता आणि संकटांचा सामना करून विजयी होण्याची मानवी जिद्द दर्शवते,” असे बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ अभिजित रॉय म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments