Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन*

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन*

पुणे, दि. ६: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वीर बाजी पासलकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ११ ऑगस्ट रोजी आयटीआय वेल्हे, ता. राजगड, जि. पुणे येथे रोजगार मेळाव्याचे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यातील उद्योजकांनी त्यांचा सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३५५ पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. ही सर्व पदे हेल्पर, ट्रेनी, मशिन ऑपरेटर, सुपरवायझर, फिटर, क्वॉलिटी इन्सपेक्टर, सीएसओ फिल्ड ऑफिसर उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या मनातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत आल्याने इच्छुक उमेदवारानी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी (Walk-in-Interview) जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा. उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०- २६१३३६०६, या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी कळविले आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments