Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिलांना नेतृत्वासाठी तयार करण्यासाठी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचा पुढाकार स्कूल ऑफ...

महिलांना नेतृत्वासाठी तयार करण्यासाठी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचा पुढाकार स्कूल ऑफ गव्हर्नन्सच्या माध्यमातून लाेकनेत्री उपक्रमाची सुरूवात

पुणे : शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे महिलांना नेतृत्वासाठी तयार करण्यासाठी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने स्कूल ऑफ गव्हर्नन्सच्या माध्यमातून ‘लाेकनेत्री’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. श्वेता शालिनी फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उप्रकम राबविला जाणार आहे.
अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठान स्कूल ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी या नवीन शाखेची सुरूवात केली आहे. डाॅ अजिंक्य डी वाय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाचे उदघाटन झाले. श्वेता शालिनी फाऊंडेशनच्या अध्यक्ष श्वेता शालिनी, पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील – ठाकरे , अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या चेअरपर्सन पूजा पाटील, उपाध्यक्ष ईश पाटील, कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन, प्राेग्राम डायरेक्टर स्नेहा मेहता यावेळी उपस्थित हाेते.
डाॅ अजिंक्य डी वाय पाटील म्हणाले, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी राष्ट्र उभारणीच्या कामात सर्वांचे याेगदान असणे महत्वाचे आहे. यामध्ये महिला माेठी भूमिका बजावू शकतात. शिक्षण- प्रशिक्षणाद्वारे त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी स्कूल ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी काम करणार आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन करताना डाॅ पाटील म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे ( एआय) खूप माेठे बदल हाेणार आहेत. नाेकऱ्यांचे स्वरुप बदलणार आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या काैशल्यांची गरज आहे. मात्र एआयच्या सकारात्मक बाजुंचाही विचार व्हायला हवा. भ्रष्टाचार विरहित आदर्श समाजाचे स्वप्न एआयमुळे साकार हाेणे शक्य आहे.
श्वेता शालिनी म्हणाल्या, महिला कधीही स्वत:पुरता नाही तर समाजाचा विचार करतात. आजपर्यंतच्या विविध अभ्यासातून हे दिसून आले आहे ज्या ठिकाणी महिलांच्या हाती सत्ता आहे तेथे विविध कल्याणकारी याेजना चांगल्या पध्दतीने कार्यरत आहे. देशाला विश्वगुरू बनायचे असेल तर पन्नास टक्के महिलांना मागे ठेऊन चालणार नाही. आखाती देशांमध्येही महिलांचे सत्तेतील प्रतिनिधीत्व ६० टक्यांच्या पुढे आहे. भारतात मात्र संसदेत ११ टक्के तर राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व नऊ टक्के आहे. त्यासाठीच नारीवंदना विधेयक महत्वाचे आहे. त्यासाठी महिलांना सक्षम करून त्यांच्यात आत्मविश्वासाचे बळ जागविण्यासाठी ‘लाेकनेत्री’ व्यासपीठ काम करणार आहे.
अंकिता पाटील – ठाकरे म्हणाल्या, महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर काम करत आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करून भविष्यातील नेतृत्व तयार करण्यासाठी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचे स्कूल ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी आणि लाेकनेत्री व्यासपीठ महत्वाची भूमिका बजावू शकते.
कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन म्हणाले, राजकारण आणि प्रशासनात नवीन पिढी घडविण्याचा हा उपक्रम आहे.
ईश पाटील म्हणाल्या, महिलांना उत्तुंग कामगिरी करून शकतात. मात्र, सर्वच महिलांना ही संधी मिळत नाही. लाेकनेत्री उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
स्नेहा मेहता यांनी उपक्रमाची माहिती दिली. प्रा. बिंदिया नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments