Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedलिशुई इंटरनॅशनल इनलाइन फ्रीस्टाइल रोलर स्केटिंग स्पर्धेत श्रेयसी जोशीला कांस्यपदक एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थिनीने...

लिशुई इंटरनॅशनल इनलाइन फ्रीस्टाइल रोलर स्केटिंग स्पर्धेत श्रेयसी जोशीला कांस्यपदक एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थिनीने भारतासाठी रचला इतिहास

पुणे, १३ ऑगस्ट: खेळाप्रती समर्पण, प्रतिभा आणि उत्कृष्टतेसाठीच्या अथक प्रयत्नांमुळे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी श्रेयसी जोशीने “लिशुई इनलाइन फ्रीस्टाइल इंटरनॅशनल” स्पर्धेत कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि डॉ. आदिती कराड यांनी तिचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या बी.टेक सीएसई तृतीय वर्षाची विद्यार्थिनी श्रेयसी जोशीने भारताचे प्रतिनिधित्व करत चीनमधील लिशुई येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘लिशुई इंटरनॅशनल इनलाइन फ्रीस्टाइल ओपन २०२६’ स्पर्धेत सिनियर महिला ‘क्लासिक स्लॅलोम’ प्रकारात कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी थेट स्पर्धा करत श्रेयसीने जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी ऐतिहासिक पोडियम फिनिश मिळवून दिले. या यशामुळे तिच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग कारकिर्दीत आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याची भर पडली आहे. तिची ही ऐतिहासिक कामगिरी एमआयटी-डब्ल्यूपीयू आणि भारतीय रोलर स्पोर्ट्ससाठी अभिमानाचा क्षण आहे.

यापूर्वी श्रेयसीने २०२५ मध्ये इनलाइन फ्रीस्टाइल वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड गेम्स यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

तिच्या या यशाबद्दल MIT-WPU चे कुलगुरू डॉ. दत्ता दंडगे, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे आणि क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments