पुणे, 17 ऑगस्ट २०२६: पीएनजी ज्वेलर्सने आपल्या बहुप्रतीक्षित ‘मंगळसूत्र महोत्सवा’ची घोषणा केली आहे. हा महोत्सव १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भारतातील सर्व पीएनजी ज्वेलर्स शोरूममध्ये सुरू असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय महिलांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, परंपरेचा वारसा जपत विविध शैलींतील मंगळसूत्रांचा सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि आकर्षक संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ‘मंगळसूत्र महोत्सव’ हा पीएनजी ज्वेलर्सचा एक वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक उपक्रम म्हणून ओळखला जातो. या महोत्सवात पारंपरिक, आधुनिक तसेच हलक्या वजनाच्या मंगळसूत्रांचा विस्तृत संग्रह उपलब्ध असून, सणासुदीच्या प्रसंगांपासून ते दैनंदिन वापरापर्यंत प्रत्येक गरज पूर्ण करणाऱ्या विविध डिझाइन्स ग्राहकांना पाहायला मिळतील. यंदाच्या संग्रहात आकर्षक सोन्याची मंगळसूत्रे, सॉलिटेअर-प्रेरित डायमंड मंगळसूत्रे, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त मिनिमलिस्ट डिझाइन्स तसेच व्यक्तिमत्त्वाला अधिक उठाव देणाऱ्या आधुनिक शैलीतील मंगळसूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्व वयोगटातील विवाहित महिलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन साकारण्यात आलेला हा संग्रह, श्रावण महिन्याच्या निमित्ताने पत्नी, सून किंवा कुटुंबातील महिलांना अर्थपूर्ण भेट देऊ इच्छिणाऱ्या पती आणि कुटुंबीयांसाठीही एक उत्तम पर्याय ठरणार आहे. उत्कृष्ट कारागिरी आणि परवडणाऱ्या किमतीचा समतोल साधत, विविध शैली, आवडीनिवडी आणि बजेटनुसार मंगळसूत्रांची निवड करण्याची संधी या महोत्सवातून ग्राहकांना मिळणार आहे.
या महोत्सवादरम्यान ग्राहकांना मंगळसूत्रांच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस केवळ ७.९९% पासून उपलब्ध असतील. ही विशेष ऑफर १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे परंपरा, प्रेम आणि वैवाहिक बंधाचे प्रतीक असलेले मंगळसूत्र आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
याबाबत बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राला नेहमीच भावनिक आणि पारंपरिक महत्त्व लाभले आहे. मात्र आजच्या महिला ते केवळ परंपरेचे प्रतीक म्हणून नव्हे, तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शैलीचाही एक भाग म्हणून आत्मविश्वासाने परिधान करत आहेत. पीएनजी ज्वेलर्समध्ये आम्ही मंगळसूत्राचे सांस्कृतिक महत्त्व जपत, आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत आणि बदलत्या आवडीनिवडींना अनुरूप डिझाइन्स सादर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. ‘मंगळसूत्र महोत्सवा’च्या माध्यमातून आम्ही देशातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण संग्रह ग्राहकांसमोर सादर करत आहोत, ज्यामध्ये परंपरेशी नाळ जपणाऱ्या तसेच आधुनिकतेचा स्वीकार करणाऱ्या प्रत्येक महिलेला तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे मंगळसूत्र निवडण्याची संधी मिळेल. हा महोत्सव म्हणजे परंपरा, आधुनिकता आणि वैयक्तिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम आहे.”
जवळपास दोन शतकांचा विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरीचा वारसा लाभलेल्या पीएनजी ज्वेलर्सने भारतीय संस्कृतीशी असलेले आपले नाते जपत विविध दागिन्यांच्या श्रेणींमध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण डिझाइन्स सादर केले आहेत. ‘मंगळसूत्र महोत्सवा’सारख्या उपक्रमांद्वारे उत्कृष्ट डिझाइन्स, वैविध्यपूर्ण संग्रह आणि ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देण्याची आपली बांधिलकी पीएनजी ज्वेलर्स पुन्हा अधोरेखित करत आहे.


