Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedझेटवर्क या तंत्रज्ञानाधारित उत्पादन व्यासपीठातर्फे 2,600 कोटींच्या नवीन समभाग इश्यूसाठी यूडीआरएचपी...

झेटवर्क या तंत्रज्ञानाधारित उत्पादन व्यासपीठातर्फे 2,600 कोटींच्या नवीन समभाग इश्यूसाठी यूडीआरएचपी दाखल

कंपनीला प्रत्यक्ष कामकाजातून मिळणारा महसूल FY26 मध्ये 40.43 टक्क्यांनी वाढून 15,913 कोटी रुपयांवर पोहोचला. नवीकरणीय ऊर्जा, वीज वहन (पॉवर ट्रान्समिशन) आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांतील वाढीमुळे ही कामगिरी साध्य झाली.
कंपनीच्या कार्यक्षमतेत FY24 पासून लक्षणीय सुधारणा झाली आहे. समायोजित एबिटा (अॅडजस्टेड एबिटा) 4.3 पटींनी वाढून 421 कोटी रुपयांवर पोहोचला. तसेच समायोजित करपूर्व नफा (अॅडजस्टेड पीबीटी) 248.8 कोटींच्या तोट्यातून सुधारत 45.7 कोटींच्या नफ्यावर पोहोचला.
कंपनीच्या उत्पादन विभागाकडे असलेल्या ऑर्डर्सचे मूल्य (मॅन्युफॅक्चरिंग ऑर्डरबुक) FY24 च्या तुलनेत दुप्पट होऊन FY26 मध्ये 12,370 कोटी रुपयांवर पोहोचले. FY26 मध्ये कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाच्या महसुलात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा वाटा सुमारे 30 टक्के होता.

लिंक : https://ir.zetwerk.com/wp-content/uploads/Zetwerk-Manufacturing-Businesses-Limited-UDRHP-I.pdf
झेटवर्क ही भारतासह जागतिक स्तरावर औद्योगिक आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेली तंत्रज्ञानाधारित आणि कमी मालमत्ता-आधारित उत्पादन व्यासपीठ कंपनी आहे. तिने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेकडे आपला अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (यूडीआरएचपी) दाखल केला आहे.
ही कंपनी तृतीय-पक्ष पुरवठादारांचे उत्पादन सामर्थ्य आणि स्वतःच्या उत्पादन सुविधा यांना एकत्र आणून ‘युनिव्हर्सल फॅक्टरी’ ही संकल्पना राबवते. हे संपूर्ण जाळे कंपनीच्या मालकीच्या ‘झेटवर्क ओएस’ या तंत्रज्ञान प्रणालीद्वारे एकत्रितपणे कार्य करते. कंपनीचे ग्राहक हे सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) असलेल्या पायाभूत सुविधा, एअरोस्पेस, अवकाश व संरक्षण, तेल व वायू तसेच औद्योगिक ऑटोमेशन अशा विविध क्षेत्रांमध्ये आहेत.
‘झेटवर्क’चे दोन प्रमुख व्यवसाय विभाग आहेत. यातील मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा विभाग कंपनीच्या पुरवठादारांच्या जाळ्याचा आणि स्वतःच्या सुविधांचा वापर करून ग्राहकांसाठी औद्योगिक व ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करतो. तसेच ‘टेरा91’ या ब्रँडअंतर्गत चालणारा इकोसिस्टीम बिझनेस हा विभाग ग्राहकांसाठी औद्योगिक वस्तूंची खरेदी व पुरवठा एकत्रितपणे करतो. सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स हा तिसरा व्यवसाय विभाग कंपनीने FY26 मध्ये बंद केला. मुख्य व्यवसायांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचा हा एक भाग होता.
प्रस्तावित ‘आयपीओ’मध्ये प्रत्येकी एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या समभागांचा 2,600 कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि विद्यमान भागधारकांकडून प्रत्येकी एक रुपया दर्शनी मूल्याचे 96,837,455 समभाग हे विक्रीसाठी उपलब्ध (ऑफर फॉर सेल) करण्यात येणार आहेत.
या इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधी झेटवर्क प्रामुख्याने कर्जफेडीसाठी वापरणार आहे. यापैकी 1,250 कोटी रुपये कंपनीच्या स्तरावरील कर्जफेडीसाठी, तर 550 कोटी रुपये उपकंपन्यांच्या कर्जफेडीसाठी वापरले जाणार आहेत. उर्वरित निधी संभाव्य अधिग्रहणे आणि इतर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येणार आहे.
कंपनीचे प्रवर्तक अमृत प्रतिक आचार्य आणि श्रीनाथ रामकृष्णन हे दोघेही ‘आयआयटी मद्रास’चे माजी विद्यार्थी आहेत. सुमारे 8 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीने भारत, अमेरिका, जर्मनी आणि स्पेनमधील स्वतःच्या 26 कारखान्यांचे, आणि विविध देशांतील 6,979 तृतीय-पक्ष पुरवठादारांचे जाळे एकत्र जोडून एकसंध उत्पादन व्यवस्था उभी केली आहे.
झेटवर्कचे हायब्रिड मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल आहे. त्यातून कंपनीला विस्तृत पुरवठादार जाळ्याचा लाभ घेता येतो. अशा तृतीय-पक्ष उत्पादकांच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पादन क्षमता उपलब्ध करून घेताना मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर, गुंतागुंतीच्या आणि उच्च मूल्याच्या उत्पादनांसाठी ही कंपनी स्वतःच्या निवडक उत्पादन सुविधांचाही वापर करते.
‘झेटवर्क ओएस’ या तंत्रज्ञान प्रणालीच्या माध्यमातून ही कंपनी एका ऑर्डरचे काम अनेक उत्पादन केंद्रांमध्ये समन्वयित करते. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होते. ही प्रणाली महत्त्वाचे निर्णय स्वयंचलितपणे घेते, अनेक हातांनी कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मदतीने पार पाडते आणि उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात एकसमान पद्धतीचा अवलंब करते. त्यामुळे विविध ठिकाणी होणारे उत्पादन अधिक सुलभपणे कंपनीला व्यवस्थापित करता येते.
31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार, ‘झेटवर्क’च्या मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्मचा ग्राहकवर्ग अत्यंत विविधांगी होता. त्यात स्टार्टअप्सपासून मोठ्या औद्योगिक कंपन्यांपर्यंत अनेक ग्राहकांचा समावेश होता. कंपनीच्या ग्राहकांमध्ये सेन्सेक्समधील 8 कंपन्या, निफ्टी 50 मधील 16 कंपन्या आणि भारताच्या फॉर्च्युन 500 यादीतील 102 कंपन्या होत्या.
कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये सिमेन्स गेमेसा, एसर इंडिया, नेक्स्टपॉवर, सीजी पॉवर, एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी, एल अँड टी एमएचआय पॉवर बॉयलर, डीआरडीओ, नाल्को, आयओसीएल, मॉर्टेनसन, नॉर्डेक्स अॅसिओना, भारतीय वायुदल आणि नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड यांचा समावेश आहे.
‘झेटवर्क’चा प्रत्यक्ष कामकाजातून मिळणारा महसूल FY26 मध्ये 40.43 टक्क्यांनी वाढून 15,913 कोटी रुपयांवर पोहोचला. FY25 मधील 11,332 कोटींच्या तुलनेत झालेली ही वाढ आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील वाढती भांडवली गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रातील बदल यामुळे कंपनीच्या ऊर्जा व्यवसायात जवळपास दुप्पट वाढ झाली आणि त्याचा महसूलवाढीत मोठा वाटा राहिला. कंपनीच्या कार्यक्षमतेतही FY24 पासून लक्षणीय सुधारणा झाली आहे. अॅडजस्टेड एबिटा FY24 मधील 97 कोटींवरून FY25 मध्ये 323 कोटी रुपयांवर आणि FY26 मध्ये 421 कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच दोन वर्षांत त्यात सुमारे 4.3 पट वाढ झाली. अॅडजस्टेड पीबीटी (करपूर्व नफा) FY24 मधील 248.8 कोटींच्या तोट्यातून सुधारत FY26 मध्ये 45.7 कोटी रुपयांच्या नफ्यावर पोहोचला.
मात्र, FY26 मध्ये कंपनीने ₹1,558 कोटींचा करपूर्व तोटा (PBT) नोंदवला. ‘आयपीओ’पूर्वी करण्यात आलेल्या दोन एकरकमी आणि रोख खर्चाशी संबंधित नसलेल्या लेखापरीक्षणीय नोंदींमुळे हा तोटा दिसून आला. यापैकी पहिली नोंद मॅनेजमेंट स्टॉक ऑप्शन्ससंदर्भातील 796 कोटींच्या इक्विटी टॉप-अपशी संबंधित होती. यामुळे कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा वाढला. या व्यवहारात कोणताही रोख खर्च झाला नाही आणि कंपनीच्या निव्वळ संपत्तीवर त्याचा परिणाम झाला नाही. दुसरी नोंद 453 कोटींच्या एकरकमी तरतुदीशी संबंधित होती. ही तरतूद कंपनीने बंद केलेल्या सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाशी संबंधित होती. व्यवसायांचे एकत्रीकरण आणि मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचा हा भाग होता.
‘झेटवर्क’च्या उत्पादन विभागाकडे असलेल्या ऑर्डर्सचे मूल्य (मॅन्युफॅक्चरिंग ऑर्डरबुक) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. FY24 मधील 6,170 कोटींवरून FY26 मध्ये ते दुप्पट होऊन 12,370 कोटींवर पोहोचले आहे.
‘झेटवर्क’ला ग्राहकांशी निर्माण झालेल्या दीर्घकालीन संबंधांचा मोठा फायदा झाला आहे. सुरुवातीला एकाच ऑर्डरपुरते मर्यादित असलेले संबंध आता अनेक उत्पादन श्रेणींमधील बहुवर्षीय करारांमध्ये रूपांतरित झाले आहेत. FY2026 मध्ये कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायातील 80.15 टक्के महसूल पुन्हा ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांकडून आला. या कालावधीत कंपनीचा ‘नेट रेव्हेन्यू रिटेन्शन’ दर 120 टक्के होता.
‘झेटवर्क’चे अव्वल 10 ग्राहक हे सरासरी सुमारे 3 वर्षांपासून कंपनीशी जोडलेले आहेत आणि ते कंपनीच्या एकूण महसुलात सुमारे 36 टक्के योगदान देतात. कंपनीने आतापर्यंत एकूण 69,588 कोटी मूल्याची उत्पादने आणि कच्चा माल पुरवला आहे. हे मूल्य जीएमव्ही (ग्रॉस मर्चंडाइज व्हॅल्यू) या आधारावर आहे.
स्वतंत्र ब्रँड मूल्यांकन करणाऱ्या ‘ब्रँड फायनान्स’ या सल्लागार संस्थेने FY2027 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘स्ट्राँगेस्ट इंडियन ब्रँड्स 2026’ या क्रमवारीत ‘झेटवर्क’ला ‘भारताचा सर्वाधिक वेगाने वाढणारा अभियांत्रिकी ब्रँड 2026’ म्हणून मान्यता मिळाली.
‘आयपीओ’च्या या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, अवेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि पॅन्टोमॅथ कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments