Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorized'भाटा'तून उलगडणार स्वप्नांसाठीच्या संघर्षाची कहाणी* *"भाटा" चित्रपाटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच*...

‘भाटा’तून उलगडणार स्वप्नांसाठीच्या संघर्षाची कहाणी* *”भाटा” चित्रपाटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच* *२८ ऑगस्ट रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित*

*

पारंपरिक समाजरचनेत प्रत्येक समाजघटकाच्या कामाचे स्वरुप निश्चित केलेले होते. मात्र, बदलत्या काळानुसार ही परिस्थिति बदलत गेली आणि नवी पिढी नवी स्वप्ने पाहू लागली. बेलदार समाजातील नव्या पिढीची गोष्ट भाटा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.उत्कृष्ट स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

व्ही. डि. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने “भाटा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रिजवान शेख, मितेश पराडकर, सुनील कातकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची आहे, तर पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांचे आहेत. श्रेयस आंगणे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून संगीतही त्यांचेच आहे तर छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे. .सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेते अरुण नलावडे, प्रशांत मोहिते अभिनेत्री रुपाली जाधव, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रेमा किरण बालकलाकार तनिष्का जाधव यांचा दमदार अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.

पिढ्यानपिढ्या दगड फोडत जगणाऱ्या बेलदार समाजातील एक बाप आपल्या मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं स्वप्न पाहतो. गरिबी, परिस्थिती आणि समाजाच्या पारंपरिक विचारांविरोधात उभा राहून आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगलं भविष्य देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बापाची गोष्ट भाटा या चित्रपटात मांडण्यात आला आहे. शिक्षण, नव्या पिढीची स्वप्ने, प्रथा-परंपरा या माध्यमातून एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा टीजर उत्सुकता वाढवणारा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments