Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedससून रुग्णालयातील ‘मावशी’ व ‘दाई’ यांचा अमनोरा येस फाउंडेशनतर्फे सन्मान.*

ससून रुग्णालयातील ‘मावशी’ व ‘दाई’ यांचा अमनोरा येस फाउंडेशनतर्फे सन्मान.*

*

पुणे : ससून रुग्णालयात रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘मावशी’ आणि ‘दाई’ यांचा सन्मान होणे अत्यंत योग्य आहे, असे प्रतिपादन बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी केले.
अमनोरा येस फाउंडेशन (सिटी ग्रुप) यांच्या वतीने ससून रुग्णालयातील मावशी व दाईंना स्व. मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. पवार बोलत होते. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव, सिटी ग्रुपचे मुख्य सामाजिक अधिकारी विवेक कुलकर्णी, तसेच बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
या पुरस्काराचे स्वरूप ₹११,००० रोख रक्कम, साडी, शाल व सन्मानचिन्ह असे होते. ससून रुग्णालयातील श्रीमती गंगुबाई धोंडीबा दळवी, श्रीमती रुमिला रवी शिंदे, श्रीमती शैला सुरेश सैद, श्रीमती सुनीता रविंद्र कांबळे, श्रीमती गौरी रविंद्र गोहीरे आणि श्रीमती सुनीता कैलास गायकवाड यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात ससून नर्सिंग कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनी प्राची बाळू चव्हाण, सिमरन सुरेंद्र मोरे, सय्यद इस्मिया जावेद आणि प्रतीक्षा जाधव यांना मीरा देशपांडे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिष्यवृत्तीचे स्वरूप प्रमाणपत्र व ₹१५,००० असे आहे.
अमनोरा येस फाउंडेशनच्या माध्यमातून रूरल गर्ल्स अकादमी हा उपक्रमही राबविला जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत चार विद्यार्थिनी क्लास-वन अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनियर झाल्या आहेत. दरवर्षी सुमारे ४० विद्यार्थिनींना मीरा देशपांडे शिष्यवृत्ती दिली जाते.
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात अमनोरा येस फाउंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, वंचित व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी संस्थेचे कार्य सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments