Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedजलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आवाहन*

जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आवाहन*

*

पुणे, दि. १९ : जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने *२१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन–रन फॉर वॉटर २०२६’* चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे सकाळी ६ ते ९ या वेळेत हा उपक्रम होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

सहभागासाठी https://register.mahaevent.co.in/#/register या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

‘महा-वॉकेथॉन’ पोलिस मुख्यालय मैदान येथून सुरु होणार असून पुढीलप्रमाणे मार्ग राहील. छत्रपती शिवाजीनगर पुणे → संचेती हॉस्पिटल चौक → जंगली महाराज रस्ता → झाशी राणी लक्ष्मीबाई चौक → घोले रस्ता → फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता →पोलिस मुख्यालय मैदान छत्रपती शिवाजीनगर पुणे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments